Sunday, August 16, 2026
Homeगुन्हेगारीपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात बॉम्ब शोधक व नाशक पथक सुरू …

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात बॉम्ब शोधक व नाशक पथक सुरू …

१२ ऑगस्ट २०२१,
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात बॉम्ब शोधक व नाशक पथक सुरू करण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी पिंपरी येथे अतिक्रमण कारवाई करताना ब्रिटिशकालीन बॉम्ब आढळून आला. यापूर्वीही अशा प्रकारचे बॉम्ब शहरात आढळून आले आहेत. शहरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास त्यात स्फोटक आहे की नाही, याबाबतची तपासणी करण्यासाठी (बीडीडीएस) पाचारण केले जाते. बॉम्ब शोधक व नाशक पथकाला तसेच शहरात महत्वाच्या व्यक्ती येणार असल्यास त्या ठिकाणी या पथकाकडून पाहणी केली जाते. मात्र, पिंपरी चिंचवड शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असले तरी बॉम्ब शोधक व नाशक पथक सुरू करण्यात आले नव्हते.

दरम्यान, बॉम्ब शोधक व नाशक पथक सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. शासनाने या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे. या पथकामध्ये सध्या दोन टीम २४ तास कार्यान्वित असणार आहे. प्रशिक्षित कर्मचारी व अधिकारी, स्फोटकाबाबतची माहिती देण्यासाठी अद्यावत साधन सामग्री आणि प्रशिक्षित श्वान पथक यांचा यात समावेश असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments