Tuesday, March 10, 2026
Homeअर्थविश्वपिंपरी चिंचवड महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी..

पिंपरी चिंचवड महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी..

३२ प्रभाग, १२८ नगरसेवक कायम – काही प्रभागांमध्ये सीमांमध्ये किरकोळ बदल, व्याप्तीत सुधारणा

पिंपरी चिंचवड (दि. ६ ऑक्टोबर २०२५) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेला हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रक्रियेत मिळालेल्या २ हरकती सूचना पूर्णतः आणि ३ अंशतः मान्य करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित सर्व हरकती अमान्य ठरविण्यात आल्या आहेत.

महानगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेची प्रसिद्धी मुख्यालय तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांत करण्यात येणार आहे. तसेच ती शासन राजपत्र आणि मनपाच्या संकेतस्थळावर देखील प्रकाशित होईल.

🔹 या प्रभाग रचनेत झालेले प्रमुख बदल

प्रभाग क्र. १ मधील ताम्हाणे वस्ती आता 

प्रभाग क्र. १२ मध्ये समाविष्ट करण्यात आली.

प्रभाग क्र. ६ मधील गावजत्रा मैदान आणि मनपा हॉस्पिटल परिसर 

प्रभाग क्र. ७ मध्ये हलविण्यात आला.

प्रभाग क्र. २४ मधील म्हातोबा वस्तीचा भाग आता प्रभाग क्र. २५ मध्ये समाविष्ट झाला.

इतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

🔹 या प्रभागांच्या भागात व्याप्ती व सुधारणा

प्रभाग क्र. १० – अण्णासाहेब मगर नगर, टिपू सुलतान नगर, बीएसएनएल परिसर, एमआयडीसी ऑफिस चिंचवड या भागांचा उल्लेख आता व्याप्तीत समाविष्ट.

प्रभाग क्र. ११ – भिमशक्तीनगर या भागाचा व्याप्तीत समावेश नोंदवला गेला.

प्रभाग क्र. २६ – वाकड या भागाचा उल्लेख व्याप्तीत स्पष्ट करण्यात आला.

🔹 पूर्वीप्रमाणेच प्रभागसंख्या आणि नगरसेवकसंख्या कायम

२०१७ च्या रचनेप्रमाणेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रचना ३२ प्रभाग आणि १२८ नगरसेवकांवरच आधारित राहणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही अंतिम रचना राजपत्र आणि अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

📍 महत्त्वाचे

• अंतिम प्रभाग रचना: मंजूर

• एकूण प्रभाग: ३२

• नगरसेवकसंख्या: १२८

• मंजुरी दिनांक: ६ ऑक्टोबर २०२५

• प्रसिध्दी: मनपा मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालये, शासन राजपत्र, आणि संकेतस्थळ

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments