Saturday, March 2, 2024
Homeअर्थविश्वकोणतीही दर वाढ नसलेला पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०२२-२३ आर्थिक वर्षाचा ६ हजार...

कोणतीही दर वाढ नसलेला पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०२२-२३ आर्थिक वर्षाचा ६ हजार ४९७ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर

पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा मूळ ४ हजार ९६१ कोटी ६५ लाख रूपये आणि केंद्र व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनांसह ६ हजार ४९७ कोटी २ लाख रूपयांचा अर्थसंकल्प महापालिका अति. आयुक्त विकास ढाकणे यांनी स्थायी समितीला आज दि.१८ फेब्रुवारी २०२२ रोजी सादर केला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती नितीन लांडगे हे होते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे हे ४० वे अंदाजपत्रक आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सन २०२२-२३ चे अंदाजपत्रक सादर केले असून महापालिकेचे हे ४० वे अंदाजपत्रक आहे. या आर्थिक वर्षात र.रु.४९६१.६२ कोटी शिल्लकेसह इतकी रक्कम जमा होईल हे अपेक्षित धरुन अंदाजपत्रक मा.स्थायी समिती मार्फत महापालिका सभेपुढे सादर केले आहे. १ हजार ५३५ कोटी ३७ लाख रूपयांच्य केंद्र व राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांच्या समावेशासह एकूण ६ हजार ४९७ कोटी २ लाख रूपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. दि.२३ फेब्रुवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत अर्थसंकल्पाच्या अभ्यासाकरिता सभा तहकूब केली आहे. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments