Tuesday, December 9, 2025
Homeताजी बातमीचार टप्प्यात पार पडणार पिंपरी चिंचवड महापालिकेची आरक्षण सोडत

चार टप्प्यात पार पडणार पिंपरी चिंचवड महापालिकेची आरक्षण सोडत

पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडत कार्यक्रम आज, मंगळवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार आहे. या सोडतीसाठी राज्य निवडणूक आयोगाने पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, त्यांच्याच अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.

महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने आरक्षण सोडतीसाठीची सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोडत चार टप्प्यांमध्ये पार पडणार असून, नियम २०२५ नुसार जागांचे वाटप करण्यात येणार आहे.

चार टप्प्यांमध्ये होणार सोडत:

१️⃣ प्रथम अनुसूचित जाती (महिला) आरक्षणाची सोडत काढली जाईल.

२️⃣ त्यानंतर अनुसूचित जमाती (महिला) आरक्षणाची सोडत होईल.

३️⃣ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) व ओबीसी महिलांसाठी आरक्षणाचे वाटप करण्यात येईल.

४️⃣ शेवटी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित केले जाईल.

दरम्यान, सोडतीच्या ठिकाणी शासकीय वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह परिसरात खासगी वाहनं न आणण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.

या सोडतीनंतर आगामी निवडणुकांचे आराखडे स्पष्ट होणार असून, राजकीय पक्ष व संभाव्य उमेदवारांच्या रणनीतींना वेग येण्याची शक्यता आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments