महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचा मुंबई येथेझाला सन्मान, सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी मिळाली दोन महत्त्वाची पारितोषिके
जागतिक आरोग्य दिनानिमित्तसोमवारी (७ एप्रिल) मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहयेथे झालेल्या “महाराष्ट्र आरोग्य सन्मान २०२५” याराज्यस्तरीय कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचा दोन पारितोषिके देऊन सन्मान करण्यातआला. महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे सभापती प्रा. रामशिंदे तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण मंत्रीप्रकाश आबीटकर यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचेअधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीयअधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. ऋतुजा लोखंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर, डॉ. संध्या भोईर, यशस्विता बाणखेले (पी.एच.एन) यांनी हा सन्मानस्वीकारला.
“महाराष्ट्र आरोग्य सन्मान २०२५” या कार्य़क्रमातसार्वजनिक आरोग्य विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याजिल्ह्यांचा, महानगरपालिकांचा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतउत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांचा व रुग्णालयांचा स्मृतीचिन्ह वप्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यातपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाला दोनपारितोषिके मिळाली आहेत.
‘राज्यातील सर्वाधिक प्रसूती करणारे नागरी प्राथमिकआरोग्य केंद्र’ या श्रेणीत कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटेस्मृती रुग्णालय आकुर्डी या रुग्णालयाला पहिल्या क्रमांकाचापुरस्कार देण्यात आला आहे. तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी(MOH Ranking) या श्रेणीत दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कारपिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मिळाला आहे. यापुरस्कारासाठी वर्षभरात रुग्णालयांद्वारे दिल्या जाणाऱ्या सर्वसेवा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, प्रजनन व बाल आरोग्यकार्यक्रम यांचा सविस्तर विचार करून आणि मूल्यमापन करूनआरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची क्रमवारी निश्चित करण्यातआली होती. या कार्यक्रमात राज्यभरातील जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका यांसह एकूण ५१ बक्षिसे प्रदान करण्यातआली. महाराष्ट्रातील २७ महानगरपालिकांपैकी फक्त ५महानगरपालिकांना एकूण ६ पारितोषिके मिळाली असूनत्यापैकी २ पारितोषिके पिंपरी चिंचवड महानगरपालिकेलामिळाली आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला राज्यस्तरावर दोन पुरस्कारमिळाले असून हा सन्मान पिंपरी चिंचवड शहरातील सर्वनागरिकांचा आहे. महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडूनसातत्याने करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट कामाचा हा सन्मान आहे. आगामी काळातही पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनाउत्तमोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी महानगरपालिकाप्रयत्नशील राहील. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवडमहानगरपालिका
महाराष्ट्र आरोग्य सन्मान २०२५’ मध्ये मिळालेले पुरस्कारम्हणजे महानगरपालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेत कार्यरतअसलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याचे आणि कर्मचाऱ्यांचे यश आहे. आधुनिक तंत्रज्ञान, डेटा-आधारित कामकाज आणिनागरिकाभिमुख दृष्टिकोन यामुळे आरोग्य सेवा अधिक प्रभावीव लोकाभिमुख करण्यास महानगरपालिका प्रयत्नशील असूनराज्यस्तरावर मिळालेले पुरस्कार या कामासाठी प्रेरणादायीठरणारे आहेत.- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवडमहानगरपालिका
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्तयांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेची वैद्यकीय आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी आम्ही अधिकाधिक प्रयत्न करतआहोत. महानगरपालिकेला मिळालेला पुरस्कार आमच्याआरोग्य विभागाने केलेल्या कामाला प्रोत्साहन देणारा आहे. यापुढेही नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यादृष्टिनेआम्ही नियोजन करीत आहोत.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरीचिंचवड महापालिका