Saturday, November 8, 2025
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवड महापालिकेचा ९ हजार ६७५ कोटी २७ लाख रूपयांचा अर्थसंकल्प सादर

पिंपरी चिंचवड महापालिकेचा ९ हजार ६७५ कोटी २७ लाख रूपयांचा अर्थसंकल्प सादर

पिंपर चिंचवड महापालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा मूळ ६ हजार २५६ कोटी ३९ लाख रूपये आणि केंद्र व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनांसह ९ हजार ६७५ कोटी २७ लाख रूपयांचा अर्थसंकल्प महापालिका प्रशासक आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीला आज (दि.२१) सादर केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे हे ३९ वे अंदाजपत्रक आहे.

अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग –२०२५-२६ या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांचा विशेष सहभाग घेण्यात आला आहे. नागरिकांनी प्रत्येक सामाजिक-आर्थिक, वय, लिंग आणि शैक्षणिक पार्श्वभूमी पार करून सक्रियपणे सहभाग नोंदवला आहे. शैक्षणिक संस्थांनी उत्साहाने या मोहिमेत भाग घेतला. नागरिकांच्या एकूण २,२७९ सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ७८६ सूचनांचा या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. 

हवामान अंदाजपत्रक – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपले हवामान अंदाजपत्रक फ्रेमवर्क लाँच केले आहे, जे असा दृष्टिकोन स्वीकारणारे जागतिक स्तरावर पाचवे शहर बनले आहे. हा उपक्रम आर्थिक नियोजनास दीर्घकालीन हवामान उद्दिष्टांसह अधोरेखित करतो, शहराच्या विकास योजनांमध्ये शाश्वतता अंतर्भूत करतो. हवामान अर्थसंकल्प हे सुनिश्चित करतो की वाटप केलेला प्रत्येक रुपया कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हवामानातील लवचिकता मजबूत करण्यासाठी योगदान देईल. यामुळे पिंपरी चिंचवडला ओस्लो, लंडन, न्यूयॉर्क आणि मुंबई यांसारख्या जागतिक शहरांच्या पंक्तीत आणले जाईल. या शहरांनी वाढत्या हवामान संकटाचा सामना करण्यासाठी समान आराखडा स्वीकारला आहे. हवामान अंदाजपत्रक प्रशिक्षण कार्यशाळेसाठी स्थापत्य, पर्यावरण, जलनिस्सारण, उद्यान, विद्युत अशा एकूण ६ विभागांना प्राधान्य देण्यात आले. संपूर्ण पदानुक्रमातील एकूण ३२४ महापालिका अधिकाऱ्यांनी हवामान अंदाजपत्रक प्रशिक्षणात भाग घेतला.

अर्थसंकल्पाची खास वैशिष्ट्ये..

०१) मनपाच्या विकासकामांसाठी र.रु. १९६२.७२ कोटी इतक्या रकमेची तरतूद केली आहे.

०२) स्थापत्य विशेष योजना या लेखाशिर्षातंर्गत र.रु. ७५३.५६ कोटी तरतूद प्रस्तावित आहे.

०३) शहरी गरीबांसाठी (BSUP) अंदाजपत्रक तरतूद र.रु. १८९८ कोटी.

०४) जेंडर बजेट- महिलांच्या विविध योजनांसाठी भरीव तरतूद र. रु. ८३ कोटी.

०५) दिव्यांग कल्याणकारी योजना तरतूद र.रु. ६२.०९ कोटी

०६) पाणी पुरवठा विषयक भांडवली विकास कामांकरिता र. रु. ३०० कोटी.

०७) पी.एम.पी.एम. एलकरिता अंदाजपत्रकात र.रु. ४१७ कोटींची तरतूद.

०८) भूसंपादनाकरिता र. रु. १०० कोटी तरतूद.

०९) अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेकरिता र.रु. १० कोटी तरतूद

१०) स्मार्ट सिटीसाठी र.रु. ५० कोटी तरतूद

११) अमृत २.० योजनेसाठी र.रु. ५५.४८ कोटी तरतूद.

आरोग्य पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण

नवीन प्रकल्प.. 

०१) तालेरा हॉस्पिटलमध्ये २५० बेडची प्रसूती वॉर्ड आणि लहानमुलांसाठी रुग्णालयाचा समावेश असेल.

०२) नव्याने उदघाटन झालेल्या तालेरा हॉस्पिटलमध्ये युरोलॉजी आणि प्लास्टिक सर्जरी विभागांचा समावेश.

०३) नवीन थेरगाव हॉस्पिटल आणि नवीन भोसरी हॉस्पिटलमध्ये डीएनबीसाठी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

०४) विद्यार्थ्यांना स्त्रीरोग, बालरोग, भूलशास्त्र या विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे.

०५) नवीन थेरगाव आणि नवीन भोसरी रुग्णालयात, इतर डीएनबी अभ्यासक्रम जसे की मेडिसिन, ईएनटी (कान-नाक-घसा), शस्त्रक्रिया, ऑर्थोपेडिक्स इत्यादीसाठी परवानगी मिळविण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे.

०६) ह. भ. प प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल, नवीन जिजामाता हॉस्पिटल आणि नवीन तालेरा हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग, बालरोग, भूलशास्त्र, औषध, ईएनटी, शस्त्रक्रिया, ऑथोपेडिक्स इत्यादी विषयांमध्ये डीएनबी अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे.

मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प

०१) मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पुणे महानगरपालिकेसोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी संयुक्तपणे राबविण्यात येत आहे.

०२) पिंपरी चिंचवड हद्दीत येणाऱ्या सुमारे १४. २० किमी लांबीच्या कामासाठी ₹७५० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात वाकड ते सांगवी फाटा या ८. ८० किमी लांबीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून या कामांतर्ग नदीपात्रात इंटरसेप्टर लाईन टाकण्यात येत असून पहिल्या टप्प्यात नाल्यावर यांत्रिक स्क्रीन बसविण्यात येत आहे.

०३) मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मुख्य कामे म्हणजे नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारणे, जलीय जैवविविधता राखणे, पूर नियंत्रणासाठी आवश्यक कामे करण आणि नदीकाठचे सुशोभीकरण करणे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments