Wednesday, June 18, 2025
Homeक्रिडाविश्वपिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविणा-या खेळाडूंचा गुणगौरव

पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविणा-या खेळाडूंचा गुणगौरव

६ जुलै २०२१,
पिंपरी चिंचवड शहराने अनेक जिल्हा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविले असून त्यांच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे शहराच्या नाववलौकिकात भर पडली असल्याचे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. शहरातील विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा गुणगौरव तसेच प्रशिक्षकांचा ऑनलाईन सत्कार समारंभ आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.

पिंपरी चिंचवड मनपा परिसरातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेले खेळाडू तसेच प्रशिक्षक यांची माहिती पुढील प्रमाणे…

अ.क्रखेळाडूची नावेखेळाची माहीती
विवेक मालशे, भांडारपाल पि.सी.एम.सीAll India Cricket Association of Deaf  या संघटनेच्या सहसचिव पदी निवड
तेजस्वी काटे, लॉनटेनिस५ वी एशियन स्पर्धा – ब्राँझ पदक खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा – ४ वेळा सहभाग ४ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग
वैष्णवी जगताप, जलतरण (दिव्यांग खेळाडू)एशियन युथ पॅरा गेम – सहभाग कॉमनवेल्थ वेल्थ गेम –6th position राष्ट्रीय स्पर्धेत – २१ सुवर्ण पदक, ३ रोप्य पदक, ४ ब्राँझ पदक राज्यस्तर स्पर्धेत – १९ सुवर्ण पदक
मंगेश कदम, डिकॅथलॉन (मैदानी)राष्ट्रीय स्पर्धेत- ४ वेळा सहभागी ३१ वी जागतिक विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
 चंद्रशेखर कुदळेराष्ट्रीय प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय पंच
रूस्तम पठाण, पी.सी.एम.सी क्रीडा विभागराष्ट्रीय खेळाडू, पोलवॉल्ट राष्ट्रीय प्रशिक्षक
श्वेता कदम, रोलबॉल१७ वी सिनिअर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राची  कर्णधार – स्पर्धेत द्वितीय क्रमांक
वैष्णवी कुलकर्णी, रोलबॉल१७ वी सिनिअर राष्ट्रीय स्पर्धेत – स्पर्धेत द्वितीय क्रमांक
रफीक इनामदारराष्ट्रीय प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय पंच
१०स्वराज राजेंद्र मोरे स्केटींग व सायकलिंगस्केटींग – ६ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत – १ रौप्य व २ कांस्य १३ वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग सायकलिंग ४ वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग १ वेळा विद्यापीठ स्पर्धेत सहभाग
११पियुष दयाराम क्षिरसागर, रोलबॉलव रोलरहॉकीमेजर ध्यानचंद पुरस्कार २०२० रोलबॉल २ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग १ वेळा शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग रोलर हॉकी १ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग आईस हॉकी भारतीय संघासाठी निवड
१२अनिकेत हरोले (पिस्तुल)२ वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग १ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग
१३ईशा सारसर (पिस्तुल)६ वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग २ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग पिंपरी चिंचवड महापौरचषक १ सुवर्णपदक
१४चिन्मय घांगुर्डे (पिस्तुल)२ वेळा राज्यस्तर स्पर्धेत १ कांस्य १ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग
१५यशराज जवळकर (पिस्तुल)४वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग १ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग
१६मेहेक शेख (पिस्तुल)२वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग १ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग
१७आर्या सोनवणे (पिस्तुल)२वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग १ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग
१८श्वेता वाळूंज (पिस्तुल)२ वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग १ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग
१९गजानन खंडागळे (रायफल)२ वेळा राज्यस्तर स्पर्धेत १ सुवर्ण १ कांस्य १ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग
२०तन्मय राईलकर (रायफल)४वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग १ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग
२१आरोही पूर्णेये  (रायफल)४वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग १ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग
२२रिया पाटील (रायफल)२ वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग
२३यजत नारखेडे (रायफल)४वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग
२४पार्थ माने (रायफल)२ वेळा राज्यस्तर स्पर्धेत १ सुवर्ण १ कांस्य १ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग  
२५अर्जून कदम (रायफल)२वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग १ वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग
२६संवेदना खांबे (प्रशिक्षक)राष्ट्रीय खेळाडू १५ वेळा राष्ट्रीय स्पर्धत १ सुवर्ण, २ रोप्य पदक, १ कांस्य पदक २५ वेळा भारतीय निवड चाचणी स्पर्धेत सहभाग    
२७सौरभ साळवणे (मुख्य प्रशिक्षक)राष्ट्रीय खेळाडू आंतरराष्ट्रीय रेफरी प्रशिक्षण दिलेले खेळाडू १)     ६ खेळाडू भारतीय संघात सहभागी २)     ६०+ भारतीय संघ निवड चाचणी ३)     २००+ राष्ट्रीय खेळाडू ४)     ४५०+ राज्यस्तरीय खेळाडू

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, महिला व बाल कल्याण समिती सभापती चंदा लोखंडे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्य संदीप वाघेरे, शैलेश मोरे, नगरसदस्य अनुराधा गोरखे, योगिता नागरगोजे, निर्मला गायकवाड, क्रीडा विभागाचे उपआयुक्त संदीप खोत, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, संजय नागपुरे, शितल मारणे, क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महापालिका नेहमी प्रयत्नशील असते. विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करताना शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केला त्याला सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला असून खेळाडूंनी आपली खिलाडू वृत्ती जोपासावी तसेच त्यांना भविष्यातील कामगिरीसाठीही शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मान्यवरांचे आभार माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments