Sunday, May 17, 2026
Homeताजी बातमीपिंपरी-चिंचवड महापालिकेची सभा आज गाजणार! स्वीकृत सदस्यांसह ५२ कोटींच्या मुद्द्यावर रणधुमाळी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सभा आज गाजणार! स्वीकृत सदस्यांसह ५२ कोटींच्या मुद्द्यावर रणधुमाळी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आज (सोमवार, दि. २०) होणारी सर्वसाधारण सभा अनेक कारणांनी राजकीयदृष्ट्या तापलेली आणि वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय या सभेत अपेक्षित असले, तरी काही वादग्रस्त मुद्द्यांमुळे सभागृहात जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यशवंतराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या बैठकीत १० नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव ऐनवेळी चर्चेसाठी येणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका नियम २०१२ नुसार संख्याबळाच्या आधारावर भाजप व अपक्ष आघाडीला ७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३ सदस्यांची संधी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, भाजपाने आपल्या कोट्यातील नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले ३ सदस्य आधीच जाहीर केले आहेत.

त्यातच राष्ट्रवादीच्या एका सदस्यावर भाजपाने आक्षेप घेतल्याने या नियुक्त्यांवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे आजच्या सभेत स्वीकृत नगरसेवकांची घोषणा होणार की पुन्हा लांबणीवर पडणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

याशिवाय, प्रारूप विकास योजनेसाठी नियोजन समिती गठीत करण्याचा प्रस्तावही महत्त्वाचा ठरणार आहे. शासन नियुक्त ४ तज्ञ सदस्यांसह स्थायी समितीतील ३ सदस्यांची नियुक्ती करून ही समिती तयार केली जाणार आहे. शहराच्या दीर्घकालीन विकास आराखड्यास गती देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असला, तरी सदस्य निवडीवरून राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तब्बल ५२ कोटी रुपयांच्या उपसूचनांचा मुद्दा सभेत गाजण्याची शक्यता आहे. या निधीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची तयारी दिसत आहे.

तसेच, प्रवीण जैन यांच्यावरील कारवाईचा मुद्दाही सभागृहात चर्चेचा केंद्रबिंदू ठरू शकतो. संबंधित प्रकरणावर ठोस निर्णय घेतला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकूणच, शहर विकास, आरोग्य, पर्यावरण, कर रचना आणि गृहनिर्माण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांबरोबरच राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे आजची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या निर्णयक्षमतेची आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेची खरी कसोटी आज लागणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments