६ एप्रिल २०२१,
केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांनुसार कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड-१९ लसीकरण कार्यक्रम दि.१६ जानेवारी २०२१ पासून राबविण्यात येत आहे. नोंदणी कृत आरोग्य सेवा देणारे व फ्रंन्ट लाईन वर्कर, वय वर्ष ४५ वरील व्यक्ती यांचे लसीकरण करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ५८ व २९ खाजगी लसीकरण केंद्रांवर दि.१६ जानेवारी २०२१ ते आज पर्यंत २,०८,७९५ (दोन लाख आठ हजार सातशे पंच्यानव) नागरीकांना लसीकरण करण्यात आलेले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभागाकडून आवाहन करण्यात येते की, पिंपरी चिंचवड शहरामधील वय वर्ष ४५ वरील नागरिकांनी त्यांनी महानगरपालिकेच्या नजीकच्या कोविड लसीकरण केंद्रावर लसीकरण करुन घ्यावे. तसेच कोविड-१९ प्रसार रोखण्यासाठी लसीकरण केल्यानंतर मास्क, सॅनिटायझर चा वापर व सामाजिक अंतर या गोष्टी पाळणे बंधनकारक आहे.