एकेकाळी पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यातील ( Bhosari) उत्कृष्ट होती. आता भ्रष्टाचाराची अड्डा झाली आहे. महापालिकेच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत. प्रशासक आणून महापालिकेत मनमानी केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यात काढण्यात येत असलेली शिवस्वराज्य यात्रा भोसरीत आली. त्यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, निरीक्षक प्रकाश म्हस्के, माजी महापौर आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे, अजित गव्हाणे उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, राज्यातील अनेक खात्यात भ्रष्टाचार सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सहा कॉरिडॉरची कामे ( Bhosari) काढली. त्याची कामे वाढीव दराने दिली आहेत. महाराष्ट्रात भ्रष्टाचार बोकळला आहे. लोकसभेत पैशाचा महापूर आणला. जाती धर्मात तेढ निर्माण करत आहेत. लोकसभेच्या अगोदर आमच्याकडे कोणी बघत नव्हते, कोणी येत नव्हते. पण, जनतेच्या मनातील गोष्टी आम्ही मांडत गेलो आणि जनतेने आम्हाला प्रतिसाद दिला. नऊ अर्थसंकल्प मांडल्यानंतर लोकसभेनंतर लाडकी बहीण योजना आणली. पिंपरी, चिंचवड, भोसरीतून महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले पाहिजेत. सरकारला आत्मविश्वास नाही. कोणी यात्रा काढत आहेत. आता योजना सांगण्यासाठी 50 हजार योजना दूत नेमणार आहेत. साडेतीन महिन्याचा कालावधी दिला आहे. 300 कोटी त्यासाठी करणार आहेत. जाहिरात करून योजना जनतेपर्यंत पोहोचवतेत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार घाबरले आहे. त्यामुळे चुकीचे निर्णय घेत आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, भोसरीतील प्रत्येक कामात भ्रष्टाचार सुरू आहे. शीतलबागेतील सात लाखाचा पूल सात कोटींवर कसा केला. मोशीत कचराडेपो नसून सोन्याचा डेपो ( Bhosari) आहे.