४ डिसेंबर २०२०,
कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी कोविड -१९ लस निर्मितीसाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांनी आगामी कोविड १९ लसीकरण नियोजनासाठी भारत देशातील सर्व शासकिय व खाजगी आरोग्य सेवा कर्मचारी (HCW) यांची माहिती अहवाल (डाटाबेस) संकलन करण्याचे काम सुरु आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आगामी कोविड -१९ लसीकरण नियोजनासाठी मनपा स्तरीय लसीकरण टास्क फोर्स समिती गठित करण्यात आलेली असून सदर समितीची बैठक आज दि.४/१२/२०२० रोजी संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकिस संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, डॉ.पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी, डॉ.लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकिय अधिकारी, डॉ.वर्षा डांगे, महिला वैद्यकिय अधिकारी, डॉ. चेतन खाडे, सर्व्हेलन्स मेडीकल ऑफिसर (डब्ल्यु.एच.ओ.) पराग मुंढे, शिक्षणाधिकारी, डॉ.चैताली इंगळे, शहर कार्यक्रम व्यवस्थापक, सुनंदा धस, शहर कार्यक्रम अधिकारी (आय.सी.डी.एस.), डॉ.सत्यजीत पाटील, अध्यक्ष निमा, डॉ.अभय तांबिले, सचिव निमा, डॉ.विजय सातव,उपाध्यक्ष आयएमए हे उपस्थित होते.
कोविड १९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी कोविड १९ लस निर्मितीसाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांनी आगामी कोविड-१९ लसीकरण नियोजनासाठी भारत देशातील सर्व अत्यावश्यक सेवेतील शासकिय व खाजगी आरोग्य सेवा कर्मचारी (HCW) यामध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी,वार्डबॉय, वार्डआया, सफाई कामगार, लॅब टेक्निशियन, सोनोग्राफी टेक्निशियन, रुग्णालयातील वाहनचालक, स्वागतिका व कार्यालयातील कर्मचारी यांना कोविड-१९ चे लसीकरण करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील शासकिय व खाजगी संस्थामधील १२२२२ आरोग्य सेवा कर्मचारी यांची माहिती वैद्यकिय विभागास प्राप्त झालेली आहे. परंतु सदरच्या आरोग्य सेवा कर्मचारी यांची माहिती पुर्ण स्वरुपात खाजगी संस्थांकडून प्राप्त न झाल्याचे आढळून येत असून इंडियन मेडिकल असोशिएशन (आयएमए) नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन (निमा) या संस्था व सर्व खाजगी वैद्यकिय व्यवसायिक यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभागाकडून आवाहन करण्यात येत की, त्यांचे संस्थेमधील आरोग्य सेवा कर्मचारी (HCW) यामध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी,वार्डबॉय, वार्डआया, सफाई कामगार, लॅब टेक्निशियन, सोनोग्राफी टेक्निशियन, रुग्णालयातील वाहनचालक,स्वागतिका व कार्यालयातील कर्मचारी यांची माहिती महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभागात सादर करावी जेणेकरुन कोविड-१९ लसीकरणापासून अत्यावश्यक सेवेमधील अधिकारी/कर्मचारी वंचित राहणार नाहीत.