पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, कालपर्यंत एकूण ३८ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतले आहेत. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवसअसल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत ४१ उमेदवारांनी अर्ज माघार घेतली असून, विविध प्रभागांतील लढतींचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. काही प्रभागांमध्ये थेट लढती निश्चित झाल्या असून, तर काही ठिकाणी बहुरंगी राजकीय समीकरणे पाहायला मिळत आहेत.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय अर्ज माघारीचा तपशील पुढीलप्रमाणे :
• अ क्षेत्रीय कार्यालय – ११
• ब क्षेत्रीय कार्यालय – २
• क क्षेत्रीय कार्यालय – १२
• ड क्षेत्रीय कार्यालय – ८
• इ क्षेत्रीय कार्यालय – ५
• फ क्षेत्रीय कार्यालय – निरंक
• ग क्षेत्रीय कार्यालय – २
• ह क्षेत्रीय कार्यालय – १
👉 एकूण अर्ज माघारी – ४१
काल नामनिर्देशन मागे घेणाऱ्या उमेदवारांची नावे –
1) अश्विनी निलेश खंडेराव – १० अ
2) रोहिणी प्रसाद रासकर -१० ब
3) भालदार गुलामअली इब्राहिम -१४ अ
4) संगिता खेमराज काळे – १५ ब
5) शुभांगी विलास शिंदे -१५ ब
6) स्मिता जयंत बागल -१५ ब
7) संगिता खेमराज काळे -१५ क
8) स्मिता जयंत बागल -१५ क
9) पूजा राजेंद्र सराफ -१८ ब
10) मनिषा चंद्रहास वाल्हेकर -१७ क
11) जुनेद अहमद चौधरी -२ क
12) खान मोहम्मद अरिफ -२ क
13) लांडगे श्रद्धा रवि – ६ ब
14) ताठे प्रसाद तुकाराम -६ ब
15) पंकज शिवाजी पवार -८ अ
16) वाघमारे राहुल बाबासाहेब -९ अ
17) अँड. दत्ता हरिश्चंद्र झुळूक -९ अ
18) कांबळे उत्तम संभाजी -९ अ
19) शेरखाने अजय देविदास- ९ अ
20) राजेश यशवंतराव नागोसे- ९ ड
21) दिपक राजू म्हेत्रे -९ ड
22) भोसले हनुमंतराव भीमराव -९ ड
23) गायकवाड विनय रमेश -२५ अ
24) मोनिका नितीन दर्शले -२५ ब
25) वाकडकर राम हनुमंत -२५ ड
26) गायकवाड ममता विनय -२६ अ
27) जयनाथ काटे -२८ ड
28) राजू बाबुराव लोखंडे -२९ क
29) रणपिसे मधुकर सोपान – २९ ड
30) जगताप अक्षय किसन -२९ ड
31) भोसले रजनी निखील -३ अ
32) सचिन किसन लांडगे -५ ड
33) शिंदे भरत किसनराव -५ ड
34) लोंढे शुभांगी संतोष -७ अ
35) लोंढे प्रज्वल संतोष -७ अ
36) साठे कल्याणी -२१ क
37) बारणे साक्षी तानाजी -२३ ब
38) आढाव आरती निलेश- ३१ अ
दरम्यान, आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणखी काही उमेदवार अर्ज माघार घेण्याची शक्यता असून, त्यानंतरच अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील राजकीय गणिते आणि प्रचाराची दिशा स्पष्ट होईल, असे निवडणूक निरीक्षकांचे मत आहे.
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता प्रचार अधिक तीव्र होणार असून, थेट जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच पक्ष आणि उमेदवार सज्ज झाले आहेत.


