पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने आज दिवसभरात एकूण ३६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली. त्यामुळे २३ डिसेंबर २०२५ पासून आजपर्यंत दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची एकूण संख्या ४९ वर पोहोचली आहे. विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केल्याने निवडणूक रणधुमाळीला वेग आला आहे.
काल दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांचा प्रभागनिहाय तपशील पुढीलप्रमाणे —
अ क्षेत्रीय कार्यालय – १२ अर्ज
प्रभाग क्र. १० — भाग्यश्री राजेंद्र कसबे (अपक्ष), तुषार रघुनाथ हिंगे (भाजप)
प्रभाग क्र. १४ — मनिषा चंद्रकांत शिंदे (अपक्ष – २), अभय बबन भंडारे (अपक्ष), संदेश सुरेश गादिया (भाजप – १, अपक्ष – १)
प्रभाग क्र. १५ — रीमा प्रवीण मेंगळे (आम आदमी पार्टी), शुभांगी विलास शिंदे (काँग्रेस)
प्रभाग क्र. १९ — मधुरा नेताजी शिंदे (भाजप), प्राजक्ता चेतन गावडे (भाजप – १, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – १)
ब क्षेत्रीय कार्यालय – ४ अर्ज
प्रभाग क्र. १७ — श्रुती मनोज तोरडमल (भाजप – १, अपक्ष – १), बिभीषण बाळू चौधरी (भाजप)
प्रभाग क्र. २२ — सचिन वसंत सोनकांबळे (अपक्ष)
क क्षेत्रीय कार्यालय – ७ अर्ज
प्रभाग क्र. ६ — प्रसार तुकाराम ताठे (अपक्ष)
प्रभाग क्र. ८ — बाळासाहेब भाऊसाहेब मोरे (शिवसेना – १, अपक्ष – १), गिरीश मोहन वाघमारे (अपक्ष)
प्रभाग क्र. ९ — चंद्रकांत महादेव लोंढे (काँग्रेस – १, अपक्ष – १), बेबी चंद्रकांत बोचकुरे (अपक्ष)
ड क्षेत्रीय कार्यालय – ५ अर्ज
प्रभाग क्र. २६ — अनुश्री अनंत कुंभार (२ अर्ज)
प्रभाग क्र. २८ — विशाल अनंतराव जाधव (२ अर्ज)
प्रभाग क्र. २९ — अक्षय किसन जगताप (१ अर्ज)
ग क्षेत्रीय कार्यालय – ५ अर्ज
प्रभाग क्र. २३ — संतोष गुलाब बारणे (शिवसेना – शिंदे गट – १, अपक्ष – १), रेखा नरेंद्र माने (भाजप)
प्रभाग क्र. २४ — निलेश हिरामण बारणे (शिवसेना – शिंदे गट – २)
ह क्षेत्रीय कार्यालय – ३ अर्ज
प्रभाग क्र. ३१ — ललित जालिंदर म्हसेकर (भाजप – १, अपक्ष – १)
प्रभाग क्र. ३२ — रसिका मधुकर त्रिभुवन (अपक्ष)
नामनिर्देशन प्रक्रियेला वाढता प्रतिसाद मिळत असून, पुढील दिवसांत अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता निवडणूक प्रशासनाने व्यक्त केली आहे.


