पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी नामनिर्देशन अर्ज वितरण प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मंगळवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शहरातील विविध प्रभागांसाठी एकूण १४३३ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांनिहाय अर्ज वितरणाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे :
अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. १०, १४, १५ व १९ साठी अनुक्रमे ६९, ४७, ५२ व ९२ असे एकूण २६० अर्जांचे वितरणकरण्यात आले.
ब क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. १६, १७, १८ व २२ साठी अनुक्रमे ४७, ३३, २५ व ४७ असे एकूण १५२ अर्ज वितरित झाले.
क क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. २, ६, ८ व ९ साठी अनुक्रमे २६, २८, ३५ व ५० असे एकूण १३९ अर्जांचे वितरण करण्यात आले.
ड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. २५, २६, २८ व २९ साठी अनुक्रमे ६९, ३७, १० व ३९ असे एकूण १५५ अर्ज वितरित झाले.
इ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. ३, ४, ५ व ७ साठी अनुक्रमे ४३, २९, २२ व ३३ असे एकूण १२७ अर्जांचे वितरण झाले.
फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. १, ११, १२ व १३ साठी अनुक्रमे ३३, ८०, २० व ३२ असे एकूण १६५ अर्ज वितरित करण्यात आले.
ग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. २१, २३, २४ व २७ साठी अनुक्रमे २८, ४३, १९ व ३२ असे एकूण १२२ अर्जांचे वितरण झाले.
सर्वाधिक अर्ज वितरणाची नोंद ह क्षेत्रीय कार्यालयात झाली असून, प्रभाग क्र. ३२, ३१, ३० व २० साठी अनुक्रमे ९२, ६८, ६८ व ८५ असे एकूण ३१३ अर्जांचे वितरण करण्यात आले.
नामनिर्देशन अर्ज वितरणाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, आगामी महानगरपालिका निवडणुकीत चुरशीची लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


