Sunday, May 17, 2026
Homeताजी बातमीपिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रारूप मतदार यादी आज जाहीर होणार

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रारूप मतदार यादी आज जाहीर होणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी आज (गुरुवार, २० नोव्हेंबर) जाहीर होणार आहे. या याद्यांवर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी नागरिकांना २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत निवडणुकीसंदर्भातील हालचाली अधिक वेग घेणार असल्याचे संकेत यामुळे मिळत आहेत.

या प्रारूप याद्यांमध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघ तसेच भोर विधानसभा मतदारसंघातील ताथवडेगाव येथील मतदारांचा समावेश असून, त्यांना प्रभागनिहाय विभागणी करून यादीत दाखल करण्यात आले आहे. मतदारसंख्येतील बदल, नव्या नोंदी आणि वगळलेल्या नोंदी याबाबत नागरिकांना हरकती घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वीकारल्या जाणार आहेत. याशिवाय, महापालिकेच्या मुख्यालयामध्येही संबंधित विभागात आवश्यक कागदपत्रांसह हरकती दाखल करता येतील.

नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरीतील सावित्रीबाई फुले सभागृहातही स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी संबंधित प्रभागातील मतदार नावे पडताळू शकतात तसेच आवश्यक असल्यास सुधारणा अर्जही भरू शकतात.

प्रारूप याद्या जाहीर झाल्यानंतर निवडणूक तयारीच्या प्रक्रियेला वेग येणार असून, पुढील टप्प्यात अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments