Wednesday, February 11, 2026
Homeअर्थविश्वपिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२६ : सकाळी ७.३० पासून मतदानाला उत्साहात सुरूवात

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२६ : सकाळी ७.३० पासून मतदानाला उत्साहात सुरूवात

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी आदी भागांतील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची गर्दी दिसून येत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे.

गेल्या काही काळापासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, आरोग्य सुविधा, स्वच्छता, वाढते कर्ज आणि शहराचा विकास हे या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे ठरले आहेत.

सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी निवडणुकीपूर्वी जोरदार प्रचार केल्यानंतर आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. प्रचार बंदीनंतर मतदार शांततेत आपला कौल देत आहेत.

मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलिसांचा तैनात करण्यात आला असून, सीसीटीव्ही व वेबकास्टिंगद्वारे मतदानावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

मतदान प्रक्रिया आज सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहणार असून, त्यानंतर मतमोजणी व निकालाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments