१४ ऑक्टोबर २०२०,
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा महापौर उषा ढोरे यांच्याकडे सादर केला आहे. महापौर ढोरे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर करून पुढील कारवाईसाठी पाठविला आहे. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके उपस्थित होते.
दरम्यान, पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी राजीनामा दिला असल्याचे पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदासाठी माई ढोरे व उपमहापौरपदी तुषार हिंगे यांना संधी देण्यात आली. त्याचवेळी पुढील 27 महिन्याच्या कालावधीत महापौर व उपमहापौरपदी तीन तीन जणांना संधी देण्याचे भाजपचे नियोजन आहे. नऊ महिने प्रत्येकाला संधी दिली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांना हा राजीनामा देण्यास सांगितले की आणखी काही यामागे कारण आहे ? ही चर्चा सुरू आहे. तसेच, उपमहापौर यांच्यानंतर महापौर ढोरे देखील राजीनामा देतील, अशी शक्यता देखील यामुळे निर्माण झाली आहे.