Sunday, July 20, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी चिंचवड महापालिकेची शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम

पिंपरी चिंचवड महापालिकेची शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध प्रभागांमध्ये आज विशेष साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबवली गेली. धार्मिक स्थळे, सार्वजनिक जागा, रस्ते आणि बागा याठिकाणी स्वच्छता उपक्रम प्रभावीपणे पार पडले. या उपक्रमाला नागरिक, स्वयंसेवी संस्था व खासगी कंपन्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शहर स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी महापालिकेने सीएसआर प्रकल्पांतर्गत खासगी क्षेत्रातील कंपन्यांबरोबर आणि स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था यांच्यासमवेत संयुक्तपणे साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. याच अनुषंगाने आज पिंपरी चिंचवड महापालिका, महिंद्रा लॉजिस्टिक्स व क्रिएटिव्ह कुटीर फाऊंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अप्पू घर पार्किंग ते दुर्गा देवी मंदिर, सेक्टर २३ दुर्गा देवी टेकडी परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमात महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे, महिंद्रा लॉजिस्टिक्सचे वरिष्ठ अधिकारी निंबा भांबरे, क्रिएटिव्ह कुटीर फाऊंडेशनचे शीतल उगले, विक्रम उगले, डॉ. सोनल बोंद्रे तसेच महापालिकेचे अन्य कर्मचारी देखील सहभागी झाले होते. याशिवाय शहरातली इतर प्रभागात देखील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचे ठिकाण खालील प्रमाणे 

अ क्षेत्रीय कार्यालय – सिद्धिविनायक मंदिर (संभाजीनगर), खंडोबा मंदिर, दुर्गादेवी मंदिर, दत्त मंदिर (उद्योगनगर)

ब क्षेत्रीय कार्यालय – इस्कॉन मंदिर, चिंतामणी मंदिर, मोरया गोसावी मंदिर, पंचनाथ मंदिर

ड क्षेत्रीय कार्यालय – म्हातोबा मंदिर परिसर, फ्रिडम पार्क ते नंदनवन सोसायटी रोड, लिनिअर गार्डन रोड, तुळजाभवानी मंदिर परिसर

इ क्षेत्रीय कार्यालय – साई पादुका मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, दुर्गामाता मंदिर, गंगोत्री पार्क, स्वामी समर्थ मंदिर

फ क्षेत्रीय कार्यालय – महादेव मंदिर (मोरेवस्ती), गणेश मंदिर (गौतम बुद्ध उद्यान), ज्योतीबा मंदिर, श्रीराम मंदिर (ठाकरे उद्यान)

ग क्षेत्रीय कार्यालय – महादेव मंदिर, बापुजीबुवा मंदिर, थेरगाव गार्डन, केजुदेवी मंदिर, बोट क्लब परिसर

ह क्षेत्रीय कार्यालय – तुळजाभवानी मंदिर, लांडेवाडी हनुमान मंदिर, आनंदवन, साईबाबा मंदिर (दापोडी), मारुती मंदिर (जुनी सांगवी)

पिंपरी चिंचवड स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबवली जात असून, नागरिकांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या प्रयत्नांना जनतेच्या सहकार्याची साथ मिळाल्यास आपण निश्चितच कचरामुक्त शहराकडे वाटचाल करू  – सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments