न्युज १४ मीडिया नेटवर्क हि एक मीडिया कंपनी म्हणून काम करत आहे. अवघ्या दोन वर्षा पूर्वी चालू झालेले न्युज १४ लाईव्ह हे ऑनलाईन वेब न्युज पोर्टल अल्पावधीतच पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या पसंतीस आले आहे. डिजिटल माध्यमातून शहरातील ताज्या घडामोडींबाबत अपडेट ठेवण्याची कामगिरी मागील दोन वर्षांपासून न्युज १४ लाईव्ह करत आहे. न्युज १४ लाईव्ह ह्या ऑनलाईन वेब न्युज पोर्टल च्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक ,सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, याला अनुसरूनच ” पिंपरी चिंचवड सन्मान – २०२३ ” सन्मान कार्याचा – गौरव शहराचा वर्ष २ रे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील साहित्यिक, सास्कृंतिक , सामाजिक , राजकिय , औद्योगिक, शैक्षणिक आणी इतर विविध क्षेत्रात भरीव कार्य करुन पिंपरी चिंचवड शहराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी न्यूज १४ मिडीया नेटवर्कच्या वतीने मागील वर्षी पासून देण्यात येणारा “ पिंपरी चिंचवड सन्मान- 2023 वर्ष २ रे ” सन्मान कार्याचा – गौरव शहराचा ह्या या पुरस्काराची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे…! या संर्दभात काही सूचना वाचकांकडून मागवण्यात येत असून आपल्या सूचना या मेल news14pcmc@gmail.com वर पाठवू शकता…. असे आवाहन न्युज १४ मीडिया नेटवर्कच्या वतीने सर्व वाचकांना करण्यात आले आहे.