Tuesday, April 21, 2026
Homeगुन्हेगारीपिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; १२ तासांत सराईत लुटारू गुन्हेगार...

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; १२ तासांत सराईत लुटारू गुन्हेगार जेरबंद…

रिक्षा चोरी करून त्याद्वारे नागरिकांना लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अवघ्या १२ तासांच्या आत केलेल्या या कारवाईमुळे पोलिसांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील चोरीचे ०३ गुन्हेएकाच वेळी उघडकीस आणले असून १ लाख ७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काय आहे सविस्तर प्रकरण?

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा (गु.र.नं. १६४/२०२६) समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-३ चे पथक करत होते. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांना समजले की, एक संशयित तरुण भोसरी येथील स्टार स्टुडिओ समोर लाल रंगाचे हुडी घालून थांबला आहे. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून हरीश विनोद कदम (वय २०, रा. लोअर इंदिरा गांधीनगर, बिबवेवाडी) याला ताब्यात घेतले.

असा झाला गुन्ह्यांचा उलगडा:

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी हरीश कदम याने गुन्ह्याची कबुली दिली. तपासात समोर आले की:

१. रिक्षा चोरी: आरोपीने सहकारनगर (पुणे) मधून एमएच १२ एसके ४१६७ ही रिक्षा चोरी केली होती. (सहकार नगर पो.स्टे. गु.र.नं. १०१/२०२६)

२. मोबाईल चोरी: चोरलेली रिक्षा घेऊन जात असताना दिघी परिसरात एका स्विफ्ट कार चालकाच्या खिडकीतून हात घालून त्याने १० हजार किमतीचा सॅमसंग मोबाईल हिसकावला होता. (दिघी पो.स्टे. गु.र.नं. १३०/२०२६)

जप्त मुद्देमाल:

• चोरीची रिक्षा (किंमत १ लाख रुपये)

• सॅमसंग मोबाईल (किंमत १० हजार रुपये)

• रोख रक्कम (२०५० रुपये)

• एकूण जप्ती: १,०७,०५०/- रुपये.

यांनी केली कामगिरी:

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, सचिन गोनटे, स्वप्निल महाले, सुंदर थोरात, तुषार वराडे, राजकुमार इघारे, निखिल फापाळे आणि तांत्रिक विश्लेषण शाखेचे सपोफौ माळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments