Sunday, October 6, 2024
Homeआरोग्यविषयकपिंपरी चिंचवड शहरात आज ११४ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर ९ जणांचा...

पिंपरी चिंचवड शहरात आज ११४ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

 

१५ डिसेंबर २०२०
पिंपरी चिंचवड शहरात आज दि १५ डिसेंबर रोजी ११४ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील १०७ तर शहराबाहेरील ७ जणांचा समावेश आहे.आज मागील २४ तासात कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला.

पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९४६३९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१३९२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७२१ जणांचा मृत्यू झालेला आहे.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ स्त्री – निगडी (५७ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – शिवणे (३६ वर्षे),शिरुर (७०वर्षे), शिरुर (७० वर्षे), न-हे (७३ वर्षे), अम्रावती (४४ वर्षे), हिंजवडी (५५ वर्षे), मुंबई (६६ वर्षे), शिरोली (५८ वर्षे) ०१ स्त्री – पेरणे (७२वर्षे) येथील रहिवासी आहेत.

वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments