Tuesday, February 11, 2025
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचा अजितदादांना पाठिंबा… शहरातील माजी नगरसेवक,पदाधिकारी कार्यकर्ते सकाळी मुंबईकडे...

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचा अजितदादांना पाठिंबा… शहरातील माजी नगरसेवक,पदाधिकारी कार्यकर्ते सकाळी मुंबईकडे रवाना

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. काका शरद पवार विरुद्ध पुतणे अजित पवार असा संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही बाजूने सर्व पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावली आहे. या बैठकीला कोण कोण उपस्थित राहते, गैरहजर राहते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान आज मुंबईत अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही या गटांची स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत उपस्थित राहण्याकरिता पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादा पवार यांना पाठिंबा दिला आहे. शहरातील शहराध्यक्षांसह माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आज बुधवारी (दि. ५) सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

पिंपरी चिंचवडमधून अजितदादा पवार यांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राजू मिसाळ, भाऊसाहेब भोईर, श्याम लांडे, राहुल भोसले, माजी नगरसेवक संजय वाबळे, मोरेश्वर भोंडवे, समीर मासुळकर, राष्ट्रवादी युवकचे विशाल वाकडकर, यश साने, प्रदिप तापकीर, श्याम जगताप, फजल शेख, इखलास सय्यद, सुशील मंचरकर, अक्षय माछरे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईला रवाना झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments