भाजपची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी रविवारी (दि.१७) जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये १ अध्यक्ष, १ वरिष्ठ उपाध्यक्ष व पक्ष प्रवक्ते, ९ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १० चिटणीस, १ कोषाध्यक्ष आणि ६३ कार्यकारिणी सदस्य यांच्यासह एकूण ९१ जणांचा समावेश करण्यात आला आहे. तर, विविध आघाड्या, सेल, मोर्चा यांचेही पदाधिकारी जाहीर केले आहेत. त्यामध्ये ३५ जणांना सामावून घेतले आहे. एकंदरीत, १२६ जणांना पदांचे वाटप करून पक्षनेतृत्वाने सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपच्या शहर कार्यकारिणीची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. भाजपमध्ये शहराध्यक्ष पदासाठी खांदेपालट झाल्यानंतर नव्या कार्यकारिणीत कोणाला संधी मिळते, नव्या-जुन्यांचा संगम साधला जाईल का, याविषयी उत्सुकता होती. ही उत्सुकता संपली आहे. मुळ कार्यकारिणीत ९१ जणांना संधी देऊन जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सामावण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, काही जुन्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा संधी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, विविध सेल, आघाड्या आणि मोर्चासाठी ३५ जणांना संधी दिली आहे. शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली.
■ सविस्तर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
शहराध्यक्ष शंकर जगताप, वरिष्ठ उपाध्यक्ष व पक्ष प्रवक्ते : राजू दुर्गे. उपाध्यक्ष माऊली थोरात, रवींद्र देशपांडे, विनोद मालू, विशाल कलाटे, सिद्धेश्वर बारणे, बिभीषण चौधरी, पोपट हजारे, बाळासाहेब भुंबे, आशा काळे. सरचिटणीस : संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शैला मोळक, शीतल शिंदे, नामदेव ढाके, विलास मडिगेरी. चिटणीस : मधुकर बच्चे, राजश्री जायभाय, गीता महेंद्र, विजय शिनकर, सागर फुगे, कविता भोगळे, हिरेन सोनवणे, देवदत्त लांडे, विशाल वाळुंजकर, महेंद्र बाविस्कर, कोषाध्यक्ष : संतोष निंबाळकर.
■ विविध मोर्चाचे पदाधिकारी :
महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, सरचिटणीस : वैशाली खाड्ये. युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, सरचिटणीस राज तापकीर. किसान मोर्चा संतोष तापकीर. : अनुसूचित जाती मोर्चा : भीमा बोबडे ओबीसी मोर्चा : राजेंद्र राजापुरे, आदिवासी मोर्चा पांडुरंग कोरके. अल्पसंख्यांक मोर्चा : सलीम शिकलगार.
■ विविध आघाड्यांचे पदाधिकारी :
कामगार आघाडी : नामदेव पवार, उद्योग आघाडी : अतुल इनामदार, व्यापारी आघाडी : भरत सोलंकी, उत्तर भारतीय आघाडी : सुखलाल भारती. दक्षिण भारतीय सेल सुरेश नायर, भटके विमुक्त आघाडी गणेश ढाकणे वैद्यकीय : प्रकोष्ठ : डॉ. प्रताप सोमवंशी. कायदा सेल अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ, सरचिटणीस अॅड. दत्ता झुळूक, सहकार सेल: माधव मनोरे, ट्रॉन्सपोर्ट सेल दीपक मोडवे. सोशल मिडिया सेल : अमेय देशपांडे, माजी सैनिक सेल रामदास मदने, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल : बळवंत कदम, दिव्यांग सेल शिवदास हांडे, बुद्धिजीवी सेल मनोजकुमार मारकड, शिक्षक सेल : दत्तात्रय यादव, अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ : जयंत बागल, पदवीधर प्रकोष्ठ : राजेश पाटील, क्रीडा प्रकोष्ठः जयदीप खापरे, जैन प्रकोष्ठ : सुरेश गादिया, सांस्कृतिक सेल : विजय भिसे, आयटी सेल : चैतन्य पाटील, आयुष्यमान भारत सेल : गोपाळ माळेकर, राजस्थान प्रकोष्ठ : मोहनलाल चौधरी, बेटी बचाओ, बेटी पढाओ (प्रकोष्ठ / सेल) : प्रीती कामतीकर.