Wednesday, July 15, 2026
Homeताजी बातमीआमदारांच्या मनमानी कारभाराचा पिंपरी चिंचवड भाजपला फटका, आणखी दोन नगरसेवकांचा भाजपचा राजीनामा

आमदारांच्या मनमानी कारभाराचा पिंपरी चिंचवड भाजपला फटका, आणखी दोन नगरसेवकांचा भाजपचा राजीनामा

आमदार महेशदादा लांडगे यांचे कट्टर समर्थक नगरसेवक संजय नेवाळे आणि भोसरीचे भाजपचे नाराज नगरसेवक रवी लांडगे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा आज बुधवारी (दि. ९) रोजी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

आमदारांची मनमानी, हुकूमशाही तसेच भाजपा मधील भ्रष्ट कारभाराला कंटाळून निष्ठावंत गटातील नगरसवेक रवि लांडगे आणि संजय नेवाळे यांनी आज आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यापूर्वी वसंत बोराटे, तुषार कामठे, माया बारणे, चंदा लोखंडे या चार नगरसेवकांनी भाजपाला रामराम ठोकला. भाजपा नेते आणि विधानसभेतील विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी थांबविण्याचा प्रयत्न करूनही रवि लांडगे यांनी पक्ष सोडल्याने आमदार महेश लांडगे आणि भाजपाला मोठा धक्का बसला असून भाजपाला लागलेली हि गळती केंव्हा थांबणार व आणखी किती नगरसेवक राजीनामा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments