Monday, October 7, 2024
Homeताजी बातमी१०० नारळाचा हार घालून केले 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर चे स्वागत

१०० नारळाचा हार घालून केले ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर चे स्वागत

११ जानेवारी २०२०,
आपण दक्षिणेत ला रजनीकांतचे फॅन तर खूप बघितले आहेत, ज्यांनी दुधाचा अभिषेक तर कधी भले मोठे पोस्टर बनवलेलं.

असाच एक पिंपरी चिंचवड मधील अजय देवगणचा चाहता संतोष उर्फ कुणाल चंदनशिवे आणि त्याचा ‘पिंपरी चिंचवड AJ फॅन क्लब’ ने अजय देवगनच्या – तान्हाजी : द अनसंग वॉरियर, या अजय देवगनच्या १०० व्या चित्रपटासाठी जय गणेश आयनॉक्स आकुर्डी येथे अजय देवगनच्या २० फूट पोस्टर बनवले असून त्याला १०० नारळाचा हार घातला आहे, या फॅन क्लब तर्फे १०० लोकांना तान्हाजी – तान्हाजी : द अनसंग वॉरियर चे तिकीट काढून हा चित्रपट दाखवला. हे पोस्टर लोकांसाठी आकर्षण झाले असून लोक तिथे सेल्फी घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

तान्हाजी : द अनसंग वॉरियर,या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. १० जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आला आहे.

आजच्या काळात शिवकालीन इतिहासावर चित्रपट बनवणे आणि त्याला समर्थन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. मागील 1 महिन्या पासून आम्ही या नियोजनासाठी कार्यरत होतो, त्यांचे चाहते म्हणून पुढच्या वेळेस आणखी मोठे नियोजन करण्याचे आम्ही ठरविले आहे.असे संतोष उर्फ कुणाल चंदनशिवे यांनी सांगितले, कुणाल हा अजय देवगण खूप मोठा चाहता असून तो कित्येक वेळा अजय देवगणला भेटलेला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments