पिंपरी- चिंचवडमधील ओमिक्रॉनच्या ६ पैकी ४ रुग्णही निगेटिव्ह झाले आहेत, तसेच पुण्यात ओमिक्रॉनची लागण झालेला रुग्ण हि आता निगेटिव्ह झाला आहे.अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीनंतर दिली.
मात्र, जे बाहेरून प्रवासी येतात, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
तसंच, “दुसऱ्या लसीच्या डोसबाबत नागरिक गंभीर नव्हते, आता बऱ्यापैकी रेट वाढला आहे. ग्रामीण भागात अजून काम करण्याची गरज आहे. किती नागरिकांचा दुसरा डोस राहिला आहे, त्यांची माहिती घेण्यात येत आहे. दोन्ही डोस दिला तर नवीन ओमिक्रॉनचा जास्त प्रभाव पडत नाही,” अशी माहिती देत असतानाच, लसीकरणाबाबत लोकांनी सहकार्य केलं नाही तर कठोर निर्णय घेणार, असा इशाराही अजित पवारांनी दिला.अजित पवार म्हणाले, “दोन्ही डोस कसे मिळतील हे पाहतोय. बूस्टर डोसबाबत देश पातळीवर हा निर्णय घ्यावा लागेल.”