Saturday, March 22, 2025
Homeआरोग्यविषयकओमिक्रॉनच्या अटकावासाठी पिंपरी प्रशासन सज्ज, जिजामाता रुग्णालयात ६ रुग्णांवर उपचार सुरु

ओमिक्रॉनच्या अटकावासाठी पिंपरी प्रशासन सज्ज, जिजामाता रुग्णालयात ६ रुग्णांवर उपचार सुरु

पिंपरी चिंचवड शहरात ओमिक्रॉनचे ६ रुग्ण आढळून आल्याने प्रशासन हायअर्लट मोडवर आले आहे. ओमिक्रॉनचा शिरकाव थांबवण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. ओमिक्रॉनचे ६ रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली यावर आयुक्त राजेश पाटील यांनी ‘ नागरिकांनी घाबरून जाऊ नये, नायजेरियातून एकच महिला आली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची टेस्ट करण्यात आली आहे.

या केसमध्ये इतरांना संसर्ग झाला असेल असं प्रथमदर्शी वाटत नाही. यापुढे प्रत्येकाने काळजी घेणे, मास्क वापरणे, गर्दी टाळणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे ज्यांनी लसीकरण केले नाही त्यांनी लसीकरण करून घ्यावे.” असे आवाहन त्यांनी केले आहे. याशिवाय परिस्थितीनुसार येत्या काळात निर्णय घेतले जातील असेही ते म्हणाले आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचे सहा रुग्ण आढळले. त्यानंतर पालिका प्रशासन सज्ज झालंय. ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांवर नवीन जिजामाता रुग्णालय राखीव ठेवण्यात आलंय. या रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

ओमिक्रॉनच्या रुग्णांसाठी जिजामाता रुग्णालय सज्ज

शहरतील ओमिक्रॉन रुग्णांची सद्यस्थिती

वय ४४ महिला
– नायजेरियाहून भावाला भेटायला आल्या.
– सौम्य लक्षण आहेत
– कोव्हीशिल्डचे दोन डोस घेतले

वय १८ मुलगी
– नायजेरिया हून मामाला भेटायला आली
– कोणतीच लक्षणे नाहीत
– कोव्हीशिल्ड दोन डोस घेतले

वय १२ मुलगी
– नायजेरिया हून मामाला भेटायला आली
– कोणतीच लक्षणे नाहीत
– अद्याप लस निर्मित नाहीत

या तिघांच्या संपर्कात १३ व्यक्ती आल्या, पैकी तिघांना ओमीक्रोनची लागण झाली

वय ४५ पुरुष
– कोणतीच लक्षणे नाहीत
– कॉव्हक्सीनचे दोन डोस घेतले

वय ७ मुलगी
– कोणतीच लक्षणे नाहीत

वय दीड वर्षे मुलगी
– कोणतीच लक्षणे नाहीत

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments