Tuesday, March 10, 2026
Homeअर्थविश्वपेट्रोल प्रथमच ९२ रुपयांवर… इंधन दरवाढीने महागाईचा भडका

पेट्रोल प्रथमच ९२ रुपयांवर… इंधन दरवाढीने महागाईचा भडका

२२ जानेवारीं २०२१,
आज मुंबईत प्रथमच पेट्रोलने ९२ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. कच्च्या तेलातील दरवाढीचा भार ग्राहकांवर लादण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. त्यानुसार आज कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी २५ पैशांची वाढ केली. या दरवाढीने मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९२.०४ रुपये झाला.

याआधी बुधवार आणि गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचा दर स्थिर होता. मात्र मुंबई आणि दिल्लीत पेट्रोल उच्चांकी स्तरावर कायम असल्याने ग्राहकांना झळ बसत आहे. इंधन दरवाढीने नजिकच्या काळात महागाईचा भडका उडेल, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. आज शुक्रवारी झालेल्या दरवाढीने मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९२.०४ रुपये झाला आहे. त्यात गुरुवारच्या तुलनेत २४ पैसे वाढ झाली. एक लीटर डिझेलसाठी मुंबईतील ग्राहकांना ८२.४० रुपये मोजावे लागतील. गुरुवारच्या तुलनेत डिझेलमध्ये २७ पैशांची वाढ झाली आहे.

दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८५.४५ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७५.६३ रुपये आहे. चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८८.०७ रुपये असून डिझेल ८०.९० रुपये आहे.कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८६.८७ रुपये असून डिझेल ७९.२३ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८८.३३ रुपये असून डिझेलचा भाव ८०.२० रुपये आहे.

इंधन दरवाढीवरून सोशल मिडियावर केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. युपीए -२ सरकारच्या काळात झालेल्या इंधन दरवाढीवर तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने टीकेची झोड उठवली होती. तेच दाखले देत आता विरोधी पक्ष सोशल मीडियावर केंद्र सरकार विरोधात टीका करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments