Thursday, September 28, 2023
Homeअर्थविश्वआज पुन्हा पेट्रोल-डिझेलचे महागले, इंधन दरवाढ थांबेना…

आज पुन्हा पेट्रोल-डिझेलचे महागले, इंधन दरवाढ थांबेना…

देशात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. एक दिवसाच्या स्थिरतेनंतर आज पुन्हा इंधनदरात वाढ झाली आहे. आज शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी ८३ पैशांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ११२.५१ रुपयावर गेले आहे. तर, डिझेल ९६. ७० रुपये प्रतिलीटर आहे.

आजच्या भाववाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११२.५१ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल९७.८१ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०३.६७ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०७.१८ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.८५ रुपये असून बंगळुरात पेट्रोल १०३.११ रुपये झाले आहे.

आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९६.७० रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.०७ रुपये इतका वाढला आहे. चेन्नईत ९३.७१ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.२२ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९३.३५ रुपये असून बंगळुरात डिझेल ८७.३७ रुपये आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाचे दर वाढत असल्यानेच देशांतर्गत इंधनाचे दर वाढत आहेत, अशा शब्दांत पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी लोकसभेत दरवाढीचे समर्थन केले. मात्र, नागरिकांना परवडेल अशा किंमतीत इंधन उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments