Wednesday, July 15, 2026
Homeताजी बातमीभाजपच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली...! राष्ट्रवादी काँग्रेसचे १०० नगरसेवक निवडून आणणार...! पक्षाला...

भाजपच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली…! राष्ट्रवादी काँग्रेसचे १०० नगरसेवक निवडून आणणार…! पक्षाला गत वैभव मिळवून देणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची खास मुलाखत

नुकत्याच काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे यांची पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी निवड झाली ,राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची नगरसेवक म्हणून ही चौथी टर्म आहे. यापूर्वी त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाची धुराही सांभाळली आहे. शहराच्या राजकारणातला शांत ,संयमी आणि सर्वसमावेशक तसेच अभ्यासू चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मा. अजित गव्हाणे यांची न्युज १४ लाईव्हच्या वतीने अविनाश कांबीकर व सचिन फुलसुंदर यांनी घेतलेली खास मुलाखत…!

प्रश्न ;– नेमके महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून शहर अध्यक्षपदाची निवड करण्याचे कारण काय ..?

अजित गव्हाणे ;- पक्षाचा कोणताही निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जातो, अध्यक्षपदाच्या निवडीचा निर्णय हा स्वतः पवार साहेब, अजितदादा तसेच जयंत पाटील साहेब आणि पक्षातील वरिष्ठांच्या सहमतीने झालेला निर्णय आहे. त्यामुळे पक्षाने दिलेली जबाबदारी पार पडणे महत्वाचे आहे.

प्रश्न ;- तुम्ही नगरसेवक होता तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष हि होता आता शहराध्यक्ष झाल्यानंतर ह्या जबाबदारीकडे कसे बघता..?

अजित गव्हाणे;- नक्कीच शहरअध्यक्ष पद हि मोठी जबाबदारी असून पक्षाच्या दृष्ठीने अत्यंत महत्वाचे पद आहे, त्यासाठी पक्षातील सर्व जेष्ठ , युवा तसेच महिला या सर्वाना सोबत घेऊन एक टीम म्हणून भविष्यात काम करणार आहे, पिंपरी चिंचवड शहरात मागील १५ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता होती, तेच गत वैभव पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार राष्ट्रवादी काँग्रेसने अजित दादांच्या काळात पिंपरी चिंचवड शहराचा जो विकास केला त्यामुळे या शहराचे नाव जागतिक पातळीवर झाले,याचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस मधील सर्वांनाच जाते.अजित दादांचे पिंपरी चिंचवड शहरावर विशेष प्रेम आहे.

येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आमचा हाच महत्वाचा मुद्दा आहे, आम्ही पूर्वी केलेलय विकासाच्या जोरावरच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत १०० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणणार असून महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणणार.

प्रश्न;- तुम्ही सत्ताधारी भाजप पक्षाकडे कसे पाहता..?

अजित गव्हाणे;- मागील ५ वर्षात भापजपाला जनतेने संधी दिली परंतु भाजपने पिंपरी चिंचवडकरांना दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत, या उलट मागील ५ वर्षात भाजपने प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला असून त्याशिवाय त्यांनी कोणतेही काम केले नाही , त्यांच्या याच निष्क्रियतेमुळे पिंपरी चिंचवड मधील जनता आम्हांला पुन्हा निवडून देईल याची मला खात्री आहे.

प्रश्न;- पिंपरी चिंचवड शहर तसेच अनाधिकृत बांधकामे आणि पाणी प्रश्नांवर पक्षाची काय भूमिका आहे..?

अजित गव्हाणे; पिंपरी चिंचवड शहर हे देशातील सर्वात वेगाने वाढणारे शहर म्हणून प्रसिद्ध आहे, या शहरात देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतून लोक कामांसाठी येतात त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर हे मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते, शहरातील सर्व घटकांना सोबत घेऊन छ. शिवाजी महाराज, शाहू , फुले ,आंबेडकरांच्या विचाराने पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन शहराचा सर्वागीण विकास करणे हेच आमच्या पक्षाचे ध्येय आहे.

शहरातील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा खूप दिवसांपासून प्रलंबित असून नुकतेच महाविकास आघाडी सरकाने गुंठेवारी कायद्याद्वारे शहरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी कायदा केला असून भविष्यात यामधील काही अटी शिथिल करुन शहरातील जास्तीत जास्त घरे नियमित करण्यासाठी काम करणार.

मागील ५ वर्षात शहरातील पाणी प्रश्नांवर काही उपाय न निघणे हे सत्ताधारी भाजपचे अपयश आहे, आमची सत्ता आल्यास पिंपरी चिंचवडवासियांना २४ तास पाणी पुरवठा कसा करता येईल त्या योजनांचा पाठपुरवठा करुन शहरवासीयांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणार. पिंपरी चिंचवड शहराचा पुढील ५० वर्षाचा विचार करुन विकासाचे नियोजन करणार

प्रश्न;- पिंपरी चिंचवड नागरी हि औद्योगिकनगरी म्हूणन ओळखली जाते, हि सांस्कृतिक नगरी ओळखावी म्हणून प्रयत्न करणार का ..?

अजित गव्हाणे; या शहराची ओळख औद्योगिकनगरी सोबतच सांस्कृतिक नगरी म्हणून हि आता होत आहे, आमच्या पक्षाचे जेष्ठ नेते मा. भाऊसाहेब भोईर हे सातत्याने शहरात सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतात या शहराला चार ते पाच नाट्यगृह मिळाले असून त्यांची निर्मितीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच झाली आहे, तसेच भविष्यात भाजपाने बंद पाडलेले काही सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न करु…

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments