Sunday, August 16, 2026
Homeताजी बातमीस्थायीच्या सभापती पदासाठी भाजपकडून नितीन लांडगे यांचा अर्ज

स्थायीच्या सभापती पदासाठी भाजपकडून नितीन लांडगे यांचा अर्ज

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदासाठी नितीन लांडगे यांचा उमेदवारी अर्ज आज (दि.०२) दाखल करण्यात आला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दुपारी ३ ते ५ यावेळेत मुदत होती. शुक्रवारी (दि.०५) रोजी दुपारी १२ वाजता सभापती पदासाठी निवडणुक होणार आहे. 

यावेळी महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर केशव घोळवे, आदी उपस्थित होते. पक्षीय बलाबलानुसार भाजपाचे संख्याबळ जास्त असल्याने स्थायीच्या सभापतीपदी नितीन लांडगे यांची निवड जवळजवळ निश्चित मानली जात आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्य आहेत. यात भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत.

भाजपचे नितीन लांडगे, रवी लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, भाजप संलग्न नीता पाडाळे, राष्ट्रवादीच्या पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर आणि शिवसेनेच्या मीनल यादव असे १६ सदस्य स्थायी समितीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments