पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे अॅड. नितीन लांडगे यांची निवड झाली आहे. अॅड. नितीन लांडगे यांच्या सामाजिक, राजकीय प्रवासाबद्दल केलेला हा खास लेख.
वडील ज्ञानेश्वर पांडुरंग लांडगे यांच्याकडून समाजकार्याचे व राजकारणाचे बाळकडू अॅड. नितीन लांडगे यांना मिळाले. पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी ज्या निवडक व्यक्तींची नावे घेतली जातात त्यामध्ये ज्ञानेश्वर पांडुरंग लांडगे यांचे नाव शहराचे शिल्पकार म्हणून आदराने घेतले जाते. नितीन लांडगे यांनी आपले प्राथमिक शिक्षण हिंदूस्थान अँटीबायोटिक्स स्कूलमधून केले तर बी. कॉम. चे शिक्षण घेतल्यानंतर नितीन लांडगे यांनी पुण्यातील प्रसिद्ध आयएलएस लॉ कॉलेजमधून एल.एल.बी. चे उच्चशिक्षण पूर्ण केले.
बालपणापासूनच सामाजिक, राजकीय वातावरणात वाढल्याने हे संस्कार आपोआप त्यांच्यावर झाले. यातूनच त्यांच्यातला सामाजिक कार्यकर्ता पुढे राजकीय नेता असा प्रवास सुरू झाला. सन 2002 मधून भोसरीतून तीन नगरसेवकांच्या पॅनलमधून पहिली निवडणूक लढविली. यानंतर त्यांनी मागे पाहिले नाही. अनेक संस्थानांमध्ये उच्चपदस्थ म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. पवना सहकारी बँकेची स्थापना, तसेच पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्ट या नामांकित शैक्षणिक संस्थेत अध्यक्ष पदावर त्यांनी कार्य केले. त्यांच्या याच सेवेमुळे जनतेने त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून निवडून देिले. 2012 आणि 2017 या दोन्ही वेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भोसरी गावठाण प्रभागातून नगरसेवक म्हणून नितीन लांडगे विजयी झाले. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या जाहिरनाम्यामधील सर्व आश्वासने पूर्ण केली.
यामध्ये धावडेवस्ती ते भोसरी गावठाण हा अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा रस्ता पूर्ण केला. सर्व्हे क्र. 1 येथे उभारण्यात आलेले सुसज्ज मल्टी स्पेशालिटी 100 बेडचे भोसरी नूतन रुग्णालय उभारले, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यास सुरुवात केली. प्रशस्त व स्वच्छ दशक्रिया विधी मंडप बांधण्यात आला. भोसरी पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरण करण्यात आले. पीसीएमटी चौक भोसरी येथे करसंकलन कार्यालय इमारतीत स्पर्धा परिक्षा केंद्राची सुरुवात केली. प्रभागात आवश्यक तेथे महिलांसाठी स्वच्छतागृह तसेच 90 कुटुंबांना वैयक्तिक स्वच्छतागृह बांधून दिले.
भोसरीतील जुनी मंडई येथे संत ज्ञानेश्वर भाजी मंडई व व्यापारी संकुल ही बहुमजली इमारत बांधली. भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज शाळेत संविधानाची प्रत उभारण्यात आली. भोसरीतील बापूजीबुवा मंदिरासमोर मनपाची आधुनिक शाळा उभारण्यास सुरुवात करण्यात आली. भोसरी गावातील लांडगे लिंबाची तालीमच्या माध्यमातून सार्वजनिक कामास सुरुवात केली. 2007 साली भोसरी कला क्रिडा मंच या सांस्कृतिक व्यासपीठाची स्थापना करून स्थानिक कलाकारांना मोफत व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. आंतरराष्ट्रीय कबड्डी पटू रामदास लांडगे यांच्या गौरवार्थ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. शिक्षण, कला, क्रिडा, आरोग्य, पर्यावरण, सहकार, महिला सक्षमीकरण यासारख्या सर्वच क्षेत्रात समाजप्रबोधनात्मक उपक्रम राबवून नागरिकांप्रती आपली सेवा अॅड. नितीन लांडगे यांनी दिली आहे.
अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे
जन्मदिनांक :
4 नोव्हेंबर 1969
शिक्षण : एल.एल.बी. (, उच्च माध्यमिक दापोडी येथील
जनता शिक्षण संस्थेचे स्वामी विवेकानंद महाविद्यालय,
)
.
2012 आणि 2017 च्या उल्लेख केलेली बहुतांशी विकासकामे माझ्या कार्यकालात पूर्ण झाली.