Saturday, December 9, 2023
Homeमहाराष्ट्रपीसीईटी - ड्रेक्सेल विद्यापीठाचा शैक्षणिक सामंजस्य करार

पीसीईटी – ड्रेक्सेल विद्यापीठाचा शैक्षणिक सामंजस्य करार

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) आणि अमेरिकेतील ड्रेक्सेल युनिव्हर्सिटी, फिलाडेल्फिया यांच्या मध्ये नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे पीसीईटी समुहातील सर्व महाविद्यालये, पिंपरी चिंचवड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नवोपक्रम, विद्याशाखा देवाणघेवाण, विद्यार्थी देवाणघेवाण आणि संशोधन उपक्रमाद्वारे शिक्षणाच्या प्रगतीला प्रोत्साहन मिळणार आहे.

पीसीईटीच्या वतीने कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि ड्रेक्सेल विद्यापीठाच्या वतीने ड्रेक्सेल विद्यापीठाचे प्रतिनिधी पॉल ई. जेन्सेन यांनी या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. यावेळी डॉ सुरेश जोशी, डायरेक्टर आणि प्रोफेसर, ड्रेक्सेल युनिव्हर्सिटी, बायोमेड क्लस्टर डायरेक्टर आणि प्रोफेसर, ड्रेक्सेल बायोमेड – इंडिया अँड ब्राझील प्रोग्राम्स, स्कूल ऑफ बायोमेडिकल इंजिनिअरिंग, सायन्स अँड हेल्थ सिस्टम्स, ड्रेक्सेल युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधी डॉ. रोजेलिओ मिनाना, पीसीसीओई चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. दिनेश अमळनेरकर, पीसीसीओई आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या सहाय्यक अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत आणि प्राध्यापक उपस्थित होते.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments