Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीफिरोदिया करंडक स्पर्धेत 'पीसीसीओई'चा बोलबाला!

फिरोदिया करंडक स्पर्धेत ‘पीसीसीओई’चा बोलबाला!

नुकत्याच झालेल्या फिरोदिया करंडक स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) आर्ट सर्कल संघाने चार पारितोषिके पटकावत उल्लेखनीय यश मिळवले. प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. आर्ट सर्कल संघाने स्पेशल इफेक्ट्स, इंस्ट्रुमेंट प्ले – मेलोडिका, वाद्य वाजवणे – काँगो, फ्रीस्टाइल नृत्य या चार प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला.

प्रा. श्रीयश शिंदे आर्ट सर्कल प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कशौनीश बोरकर, कृष्णा कलासपूरकर, सोहम ब्राह्मणकर, निधी वर्तक, शंतनु सोनार, आशुतोष ताकपिरे, प्रणम्या राजीवन, तन्वी शिंपी, श्रृष्टी सरोदे, आर्या दाभोलकर, प्रफुल्ल गुंजाळ, केदार फुल्सवांगे, आर्या देशपांडे, ओंकार पडवळकर, समृध्दी निंबाळकर, आयुष देशमाने यांनी उल्लेखनीय काम केले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, डीन एस. डी. डब्ल्यू. डॉ. प्रवीण काळे यांनी आर्ट सर्कल संघातील विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments