Saturday, September 30, 2023
Homeआंतरराष्ट्रीयइंडोनेशियाच्या पूर्वेकडील पापुआ बंदरावर पोपटांची तस्करी.

इंडोनेशियाच्या पूर्वेकडील पापुआ बंदरावर पोपटांची तस्करी.

21 November 2020.

इंडोनेशियाच्या पूर्वेकडील पापुआ बंदरावरील एका जहाजावर प्लास्टिकच्या बंद बाटल्यांमध्ये पोपट सापडले. या पोपटांची तस्करी केली जात होती.

पोलिसांनी या जहाजातून 64 जिवंत आणि 10 मेलेल्या पोपटांना जप्त केलं.

इंडोनेशियामध्ये आशियातील इतर देशांच्या तुलनेत अनेक पक्षांच्या प्रजातींची संख्या धोक्याच्या स्थितीत आहेत. म्हणजे अगदी लुप्त होण्याच्या मार्गावरच आहेत. या देशात वन्यजीवांची अवैध शिकार मोठ्या प्रमाणात होते.

इंडोनेशियात पक्ष्यांची बाजारात विक्री होते किंवा इतर देशात तस्करी केली जाते.

बंदरात उभ्या असलेल्या जहाजात सापडलेले हे पोपट नेमके कुठल्या देशात पाठवले जात होते, याची अद्याप माहिती मिळाली नाहीय.

जहाजावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका डब्यातून विचित्र आवाज येऊ लागला. त्या डब्यात प्राणी असण्याची शंका आल्यानं याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

वन्यजीवांच्या तस्करीवर लक्ष ठेवून असलेल्या संस्थेच्या एलिझाबेथ जॉन यांचं म्हणणं आहे की, पाळीव प्राणी-पक्ष्यांच्या अवैध बाजारात विक्रीसाठी हे पोपट नेले जात होते आणि हे काही पहिल्यांदाच होतंय असं नाही. प्लास्टिकच्या बाटलीत पोपटांना असं अनेकदा नेलं जातं.

2015 सालीही पोलिसांनी दुर्मिळ पक्षी नेतांना काहीजणांना अटक केली होती. ती व्यक्ती 21 पिवळे कॉकूट पक्षी बाटलीत बंद करून नेत होती. तसंच, 2017 साली इंडोनेशियातील अधिकाऱ्यांना ड्रेन पाईपमध्ये 125 दुर्मिळ पक्षी सापडले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments