Friday, June 13, 2025
Homeताजी बातमीपर्णकुटी संस्थेचा रेडलाईट एरियातील महिलांना मदतीचा हात

पर्णकुटी संस्थेचा रेडलाईट एरियातील महिलांना मदतीचा हात

१२ जुलै २०२१,

पर्णकुटी संस्थेने रेडलाईट एरियातील महिलांना वाटले हॅपीनेस किट
महिला आणि बालकांच्या आरोग्य, आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत असणा-या ‘पर्णकुटी’ या संस्थेच्या वतीने पुण्यातील रेडलाईट एरियामध्ये हॅपीनेस किटचे वाटप करण्यात आले. या हॅपीनेस किटमध्ये चार व्यक्तींच्या एका कुटूंबाला आठ दिवस पुरेल एवढा किराणा माल, स्वच्छता व आरोग्य विषयक साहित्य आणि सॅनिटरी पॅडस देण्यात आले आहेत. अशी माहिती पर्णकुटी संस्थेच्या अध्यक्षा रंजना सिंह आणि सह संस्थापिका स्नेहा भारती, अनुष्का खुराणा यांनी प्रसिध्दीस दिली आहे.


मार्च 2020 पासून देशात कोरोना कोविड -19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्यामुळे मागील दिड वर्षात सर्वच उद्योग व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. त्याचा परिणाम रोजगार व आर्थिक उलाढालीवर झाला आहे. त्यामुळे शहरातील ‘वारांगनांच्या’ उत्पन्नावर देखिल प्रतिकूल परिणाम झाला आहे. बहुतांशी वारांगना आपले मुळगांव सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी ग्राहकांच्या शोधात पुण्यातील रेडलाईट एरियात भाडोत्री खोलीत राहतात. येथे त्यांना किमान आवश्यक अशा आरोग्य, वैद्यकीय सुविधा देखिल मिळत नाहीत. अपु-या जागेतील अंधा-या खोलीत त्या आपल्या तुटपूंज्या उत्पन्नावर कुटूंबाचा चरितार्थ चालवितात. या वारंगनांचा शोध घेऊन त्यांच्यासाठी पर्णकुटी हि सामाजिक संस्था आरोग्य, वैद्यकीय सुविधा पोहचविण्याचे काम करते.

पर्णकुटी संस्थेने हॅक्सा वेअर, लोनटॅप, डॉकबॉइज आणि सास इंडिया या कार्पोरेट संस्थांच्या सहाय्याने लॉकडाऊन काळात आतापर्यंत 4545 कुटूंबाना आणि जवळपास दोन लाख गरजूंना ‘हॅपीनेस किट’ देऊन मदतीचा हात दिला आहे. या व्यतिरिक्त या महामारीच्या काळात पर्णकुटीने वारांगनांसह, कामगार, बेरोजगार, आर्थिक दुर्बल घटकातील कुटूंब आणि झोपडपट्टी परिसरातील नागरीकांना देखिल मदत केली आहे. ज्या वारांगना या क्षेत्रातून बाहेर येऊ इच्छितात त्यांना व्यावयायिक शिक्षण, हस्तकला निर्मितीच्या व्यवसायासाठी मार्गदर्शन व अर्थसहाय्य, वितरण व विपणन सहाय्य पर्णकुटी संस्थेच्या वतीने करण्याचा मानस आहे. अशीही माहिती पर्णकुटीच्या अध्यक्षा रंजना सिंह यांनी दिली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments