Saturday, March 2, 2024
Homeअर्थविश्वसंसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज पासून सुरुवात…

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज पासून सुरुवात…

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने त्याची सुरुवात होईल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केले जाईल. देशाच्या आर्थिक विकासाचे चित्र स्पष्ट करणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सोमवारी संसदेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी आर्थिक सर्वेक्षण करोनाच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाचा वेग स्पष्ट करेल. आर्थिक सर्वेक्षण सर्वेक्षण हा चालू आर्थिक वर्षाचा लेखाजोखा असेल आणि यामध्ये देशाचा जीडीपी नऊ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. देशाचे आर्थिक सर्वेक्षण आर्थिक व्यवहार विभागाने तयार केले आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले जात असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाचे कामकाज दोन सत्रांमध्ये होईल. २ ते ११ फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचे कामकाज प्रत्येकी पाच तास होणार आहे. राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ आणि लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालेल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोमवारी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला जाईल. १ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी शून्य प्रहर व प्रश्नोत्तराचा तास होणार नाही.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण सुरू झाले आहे. यासोबतच संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही सुरू झाले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसद भवनात पोहोचल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली.

आपण जगातील सर्वात जास्त लसीचे डोस असलेल्या आघाडीच्या देशांपैकी एक करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या जागतिक महामारीचे हे तिसरे वर्ष आहे. या काळात भारतातील लोकांची लोकशाही मूल्यांवरील श्रद्धा, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा अधिक दृढ होत असल्याचे आपण पाहिले आहे, असे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात भारताच्या क्षमतेचा पुरावा लसीकरण कार्यक्रमात दिसून आला आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत १५० कोटींहून अधिक लसीचे डोस देण्याचा विक्रम आम्ही पार केला आहे. आज आपण जगातील सर्वात जास्त लसीचे डोस असलेल्या आघाडीच्या देशांपैकी एक आहोत, असे राष्ट्रपती म्हणाले.

जागतिक परिस्थितीत भारतासाठी खूप संधी – पंतप्रधान मोदी
“आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. मी तुमचे आणि सर्व संसद सदस्यांचे या अधिवेशनात स्वागत करतो. आजच्या जागतिक परिस्थितीत भारतासाठी खूप संधी आहेत. हे अधिवेशन देशाची आर्थिक प्रगती, लसीकरण कार्यक्रम, भारतात बनवलेल्या लसीकरणाबाबत लसीबद्दल जगामध्ये विश्वास निर्माण झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनापूर्वी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments