९ डिसेबंर २०२०,
चिंचवड येथील एल्प्रो शाळेविरूद्ध विरोधात पालकांनी “आम्ही फसलो, तुम्ही नका फसू, असे होर्डींग लावून शाळेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे होर्डींगची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
कोरोना महामारीत सर्वत्र शाळा ऑनलाइन सुरु होत्या. ऑनलाइन शाळा सुरु असताना संपुर्ण वर्षांचे शुल्क आकारले जात आहे. याविषयी पालकांनी महापालिका शिक्षण विभागाकडे तक्रार केली. त्यानूसार एल्प्रो शाळेविरूद्ध पॅरेंट्स असोसिएशनने लेखी तक्रारीनूसार शाळेला सुनावणीला बोलावले होते. परंतु, शाळेने आमच्याकडे पालकांची एकही तक्रार नाही’, असे सांगत सुनावणीला गैरहजेरी दर्शविली.
तर कायद्याला न जुमानणाऱ्या शाळेविरूद्ध पालकांनी शाळेसमोर, चिंचवडगावातील अहिंसा चौक आणि दर्शन हॉलसमोर फलक लावले आहेत. “आम्ही फसलो, तुम्ही नका फसू! आमच्या मुलांचे भवितव्याचे काय?’, असे प्रश्न शाळा व्यवस्थापनाला फलकाद्वारे उपस्थित केला आहे. याबाबत स्कूलचे समन्वयक शिवप्रसाद तिवारी म्हणाले, “पालकांनी लावलेल्या फलकाबाबत मला काहीच माहिती नाही.” दरम्यान पालकांच्या प्रतिक्रिया संतप्त असून मागील दोन वर्षापासून स्कूल प्रशासनाकडून सतत पालकांना फसवले जात आहे.