Thursday, May 15, 2025
Homeताजी बातमीपंजाब – अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्या गाडीवर हल्ला; गोळीबाराचीही घटना

पंजाब – अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्या गाडीवर हल्ला; गोळीबाराचीही घटना

पंजाबच्या जलालाबादमध्ये अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असल्याचा दावा अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या हल्ल्यानंतर काँग्रेस व अकाली दलाचे कार्यकर्ते देखील आपसात भिडले होते. यावेळी तुफान दगड-विटा एकमेकांवर फेकण्यात आल्या, एवढच नाही तर गोळीबार झाल्याची देखील माहिती समोर येत आहे.

जलालाबादमध्ये नगर काउन्सिलची निवडणूक होत आहे. काल काँग्रेस व आम आदमी पार्टीच्या कार्यकर्ते आपसात भिडले होते. आज अकाली दलाचा उमेदवार अर्ज दाखल करणार होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल हे तिथं पोहचले होते. सुखबीर बादल यांच्या वाहनांचा ताफा येताच, त्यावर जोरदार दगडफेक सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला.

अकाली दलाकडून या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांच्या नेतृत्वात या घटनेचा तपास केला जावा अशी देखील मागणी केली गेली आहे.

अवश्य वाचाः VIDEO : ‘ती’ व्यायाम करत व्हिडीओ बनवत होती, मागे म्यानमारचा तख्तापलट होत होता

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments