14 November 2020.
दहशतवाद्यांना नियंत्रण रेषा ओलांडता यावी यासाठी वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्यानं जोरदार प्रत्युत्तर दिलं.
पाकिस्तानी सैन्याचे ११ सैनिक भारताच्या प्रत्युत्तरात मारले गेले. तर १६ सैनिक जखमी झाले. भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान हादरला आहे.
पाकिस्ताननं भारतीय राजदूतांना समन्स बजावलं आहे. पाकिस्तानचे डीजी आणि परराष्ट्र मंत्री एम. एम. कुरेशी आज माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
यामध्ये भारताचे ५ जवान शहीद झाले. यामध्ये लष्कराच्या चार, तर सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाचा समावेश आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात ६ नागरिकांचाही मृत्यू झाला.
केरन, पुंछ आणि उरीमध्ये गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचे बंकर आणि लॉन्च पॅड भारतानं उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईनं पाकिस्तान बिथरला आहे.