Monday, May 12, 2025
Homeआरोग्यविषयकपद्मजा हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

पद्मजा हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

वाल्हेरकरवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलतर्फे नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 9 फेब्रुवारीपर्यंत हे शिबीर सुरू राहणार आहे. या शिबीरात रक्तदाब तपासणी, ऱ्हदयरोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, नाक, कान, घसा, नेत्ररोग, दमा तपासणी व सामान्य आजाराची तपासणी करण्यात येणार आहे.

सदर शिबीरामध्ये वृद्धांसाठी खास सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच शिबीराद्वारे रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांच्या बिलात 20 टक्के सवलत देण्यात येणार आहे. मोफत आरोग्य शिबीरात करण्यात येणाऱ्या तपासणी जसे एक्सरे यात 20 टक्के, 350 रूपयांच्या इसीजीसाठी 200 रूपये, रक्त तपासणीसाठी 20 टक्के सूट असून बी. एस. एल. ची 150 रूपयांची तपासणी 50 रूपयांत करण्यात येणार आहे.

तरीही या आरोग्य शिबीराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments