मुरबाड (ठाणे)येथून मुंढवा पुण्याकडे द्रवरुप ऑक्सिजन वाहतुक करणारा केए-०१-एडी-९८३० असा वाहन क्रमांक असलेला टॅंकर निगडी येथील मधुकर पवळे पुलाच्या अलीकडे रस्ता दुभाजकाला धडकून अपघातग्रस्त झाला आहे.
निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाण पूल व मधुकर पवळे उड्डाण पूल याठिकाणी भुयारी मार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी टॅंकरचा अपघात झाला आहे. या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली असून टँकरला बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
सदर वाहनातील हेल्पर सुखदेवसिंह चौहान वय 48 वर्षे जखमी असून त्यांचेवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.या कामाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आला नसल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही. अचानक वळण घेण्याच्या प्रयत्नात गाडी कठड्यावर आदळून अपघात होत आहेत.
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहीवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता अजय सूर्यवंशी, उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे घटनास्थळी उपस्थित आहेत.