Wednesday, June 18, 2025
Homeआरोग्यविषयकरेड स्वस्तिकच्या मानवतावादी आरोग्य उपक्रमांनी भारावून गेलो- डॉ. संजय शिंदे (अप्पर पोलीस...

रेड स्वस्तिकच्या मानवतावादी आरोग्य उपक्रमांनी भारावून गेलो- डॉ. संजय शिंदे (अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड )

मानवतावादी आरोग्य क्षेत्रात कार्यरत रेड स्वस्तिक चा 21 व्या वर्धापन दिनाचा शानदार सोहळा आज मोशीतील हॉटेल मोशी ग्रँड हॉटेलमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, माजी पोलिस महासंचालक तथा रेड स्वस्तिक चे संस्थापक डॉ. टी. एस. भाल, अखिल भारतीय अध्यक्ष श्री. सुरेश कोते, मा. पोलीस आयुक्त श्री चंद्रकांत कुंभार, सहाय्यक आयुक्त सागर कवडे, सह महाव्यवस्थापक श्री. अशोक शिंदे, श्री रोशन मराठे या कार्यक्रमाचे संयोजक तथा जिल्हाध्यक्ष श्री संतोष बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

रेड स्वस्तिक जिल्हाध्यक्ष श्री संतोष बारणे

प्रारंभी प्रार्थनेने सुरुवात झाली. यावेळी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. जन्मतः अपंगत्व असलेल्यांना सक्षम करणारे मुंबईचे प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ.अमित जैन, डॉ. राजेश पांचाळ, प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. निशित अग्नी,मुंबईच्या प्रसिद्ध आरोग्यसेविका पिंकी ताई पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय जोगदंड, श्री. शिवाजीराव गवारे, सहाय्यक आयुक्त श्रीयुत भोसले, सहाय्यक परिवहन अधिकारी श्री. आर. एन. पाटील, भैरव हॉस्पिटलचे श्री. अनिल जैन, केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे विजय पाटील,श्री. शंकर मोहिते, डॉ. अनिल रोडे, गणेश पाटील, श्री. जे. बी. पाटील, श्री. राजेंद्र अंजनकर, श्री. विकास साने यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रेड स्वस्तिक चे सह महाव्यवस्थापक श्री. रोशन मराठे यांनी यानंतर आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राज्यभर मोफत सेवा देणार असल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाचे आयोजक व जिल्हाध्यक्ष श्री.संतोष बारणे यांनी मोशी परिसरात डायलेसिस सह विविध अत्याधुनिक सेवा उपलब्ध करणार असल्याचे जाहीर केले.

यावेळी सह महाव्यवस्थापक श्री. अशोक शिंदे,अखिल भारतीय अध्यक्ष श्री. सुरेश कोते यांनी मनोगत व्यक्त करून विविध उपक्रमांची माहिती दिली.मुख्य अतिथी अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करून पोलिसांच्या सहकार्याने विविध आरोग्य उपक्रम राबवावेत असे आवाहन केले. यावेळी केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे राज्याध्यक्ष श्री. विजय पाटील यांनी रेड स्वस्तिक सोबत महाराष्ट्रभर प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग व मोफत औषधी उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले.

या सोहळ्यास संस्थापक डॉ. टि. एस.भाल यांनी ही लोक चळवळ करण्यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार डॉ.बबन डोळस यांनी मानले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध आरजे अक्षय व सौ.शोभा कुलकर्णी यांनी करून कार्यक्रमात रंगत आणली. रेड स्वस्तिक सोसायटी च्या वर्धापन दिन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी डॉ.उमाकांत वाबळे,राजेश सोमवंशी. नंदू रायगडे, सचिन भाऊ बारणे,ओम प्रकाश बहिवाल, श्रीकांत देशमुख, अश्विनी वंधारे, गणेश पाटील यांच्यासह अनेक सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments