Thursday, September 28, 2023
Homeताजी बातमीअतिवृष्टी आणी चक्रीवादळामुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द

अतिवृष्टी आणी चक्रीवादळामुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द


१५ आॅक्टोबर २०२०,
पुणे शहर आणि जिल्ह्याला बुधवारी दुपारपासून पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. दरम्यान अतिवृष्टी आणि चक्रिवादळामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आज होणाऱ्या सर्व नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल अशी माहिती कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे.

जोरदार पावसामुळे अनेक सोसायट्यांमध्ये तर पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरलं होतं. आणखी दोन दिवस असाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पण बुधवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने शहराच्या मध्यभागी म्हणजेच पेठांचा सर्व भाग पाण्याने साचला होता. ५० हून अधिक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. हे पाणी काढण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ सुरू होती. मदतीसाठी अग्निशामक विभागाच्या कार्यालयमध्ये सतत फोन सुरु होते.

पावसात अनेक नागरिकांच्या गाड्या देखील वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर त्याच दरम्यान शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी शिरल्याची घटना घडली. यामुळे पोलिसांना टेबलवर बसून काम करावे लागलं.

खडकवासला धरणातून ३४२० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडले पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून धरण क्षेत्रातून नदी पत्रात ३४२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सात वाजता सोडण्यात आला आहे. तसेच परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग सोडला जाणार असल्याचा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments