पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे दृष्टिकोनातून 16 वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १२ एप्रिल २०२२ ते २६ एप्रिल २०२२ दरम्यान होणाऱ्या ह्या स्पर्धेत यजमान व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीच्या संघासह पूना क्लब, पीवायसी, डेक्कन जिमखाना, युनायटेड क्रिकेट अकॅडमी, क्लब ऑफ महाराष्ट्र, स्टार क्रिकेट क्लब, आर्यन्स क्रिकेट अकॅडमी अशा नामांकित ८ संघांना निमंत्रित करण्यात आले आहे, सुरुवातीला दोन गटात साखळी सामने होतील व गुणानुक्रमे चार अव्वल संघांमध्ये उपांत्यफेरीचे सामने होतील अंतिम सामना २६ एप्रिल २०२२ रोजी होईल.
दरम्यान १२ एप्रिल २०२२ रोजी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि अकॅडमीचे प्रमुख दिलीप वेंगसरकर ह्यांचे हस्ते स्पर्धेचे उदघाटन थेरगाव येथील मैदानावर होईल ,स्पर्धेतील साखळी सामने डेक्कन जिमखाना, आर्यन्स अकॅडमी आणि व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी थेरगाव येथे होतील, उपांत्यफेरीचे दोन सामने आणि अंतिम सामना व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीच्या मैदानावर होईल. प्रत्येक सामना ४५ षटकांचा असेल,प्रत्येक सामन्यातील सामनावीरांना व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज,गोलंदाज,क्षेत्ररक्षक व स्पर्धेतील मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंना तसेच उपविजेता व विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात येईल. अशी माहिती डॉ,विजय पाटील यांनी दिली.