Monday, May 12, 2025
Homeक्रिडाविश्व१३ वर्षाखालील मुलांच्या "व्हेरॉक कप २०२१" क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

१३ वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप २०२१” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

१२ मार्च २०२१,
सालाबादप्रमाणे या वर्षीही पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे दृष्टिकोनातून १३ वर्षा खालील मुलांच्या “व्हेरॉक कप २०२१” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक १६ मार्च २०२१ ते १९ मार्च २०२१ दरम्यान होणाऱ्या ह्या स्पर्धेत यजमान वेंगसरकर अकॅडमीच्या संघासह खालील संघ सहभागी होणार आहेत.

  • फ्रेंड्स क्रिकेट अकॅडमी,
  • महेंद्र गोखलेज अकॅडमी,
  • प्राधिकरण जिमखाना,
  • गॅरी कर्स्टन अकॅडमी,
  • एच के बाऊन्स अकॅडमी,
  • स्पार्क स्पोर्ट्स अकॅडमी,
  • स्पोर्टिव्ह क्रिकेट अकॅडमी,
  • डॉमनिक क्रिकेट अकॅडमी,
  • स्पोर्ट्स पार्क अकॅडमी,
  • साईरंग फाउंडेशन लक्ष क्रिकेट ऍकॅडमी,
  • चोंधेपाटील अकॅडमी,

अशा नामांकित बारा संघांना निमंत्रित करण्यात आले आहे, सुरुवातीला चार गटात साखळी सामने होतील व गुणानुक्रमे चार अव्वल संघांमध्ये १९ मे २०१९ रोजी सकाळच्या सत्रात दोन उपांत्य सामने होतील, अंतिम सामना १९ मार्च २०२१ रोजी दुपारी होईल,थेरगाव येथील मैदानावर १६ मार्च २०२१ रोजी स्पर्धेचे उदघाटन होईल , स्पर्धेतील सर्व सामने थेरगाव येथे होतील.

प्रत्येक सामना २० षटकांचा असेल,प्रत्येक सामन्यातील सामनावीरांना व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज,गोलंदाज,क्षेत्ररक्षक व स्पर्धेतील मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंना तसेच उपविजेता व विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात येईल, पारितोषिक वितरण १९ मार्च २०२१ रोजी भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांचे शुभहस्ते होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments