पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडूनप्राप्त झालेल्या भारत निवडणूक आयोगाच्या यादीतील प्रभागनिहाय मतदार विभाजनाचे काम नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीकाटेकोरपणे आणि दिलेल्या मुदतीत पुर्ण करावे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिल्या.
महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने मतदार यादी तयार करण्यासाठी आज पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदीर येथे प्रशिक्षणआयोजित करण्यात आले होते. यामध्ये पर्यवेक्षक आणि प्रगणकांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनीमार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, प्राधिकृत अधिकारी प्रशांत जोशी, सहाय्यक प्राधिकृत अधिकारी अजयचारठाणकर, विजयकुमार थोरात, रविकिरण घोडके, उमाकांत गायकवाड, अभिजित हराळे, शीतल वाकडे यांच्यासह पर्यवेक्षक आणि प्रगणकउपस्थित होते.
प्रारूप प्रभाग रचनेच्या अनुषंगाने महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजनाचे काम सुरु करण्यातआले आहे. यासाठी सहाय्यक प्राधिकृत अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली महापालिका उपअभियंत्यांना पर्यवेक्षक म्हणुन नेमण्यात आले आहे. तर लिपिक, स्थापत्य सहाय्यक, ग्रंथपाल कम लिपिक, मीटर निरीक्षक आदी कर्मचाऱ्यांकडे प्रगणकाची जबाबदारी देण्यात आली आहे. सहायादी भागाचे काम प्रत्येक प्रगणकाने करायचे आहे. मतदान यादीतील मतदार पिंपरी चिंचवड महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभागनकाशाप्रमाणे कोणत्या निवडणूक प्रभागात समाविष्ट होतो याची निश्चिती केली जाणार आहे. दि.२४ फेब्रुवारीपर्यंत हे काम पुर्ण केले जाणारआहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.