Wednesday, July 15, 2026
Homeआरोग्यविषयकपर्यावरण आणि स्वच्छाग्रह उपक्रमाचा संदेश देण्यासाठी “पिंपरी चिंचवड सायक्लोथॉन रॅली”चे आयोजन

पर्यावरण आणि स्वच्छाग्रह उपक्रमाचा संदेश देण्यासाठी “पिंपरी चिंचवड सायक्लोथॉन रॅली”चे आयोजन

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य समजून हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होण्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यादृष्टीने दैनंदिन जीवनात वाहतुकीचे साधन म्हणून सायकलचा वापर किमान आठवड्यातून एकदा तरी करावा. इलेक्ट्रिक बाईकचा वापर करावा. जेणेकरून प्रदूषण कमी होईल व पर्यावरणाची हानी टळेल, असे मत पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये पर्यावरण आणि स्वच्छाग्रह उपक्रमाचा संदेश देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटी च्या वतीने “पिंपरी चिंचवड सायक्लोथॉन रॅली २०२२” चे आयोजन करण्यात आले होते. आज रविवारी सकाळी ६ वा. नाशिक फाटा ते बीआरटीएस रस्त्यावरील कल्पतरू सोसायटी येथून चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जग बदलले आहे. सुखसोयी पायाजवळ आहेत. गरजाही पूर्ण होत आहेत. असे असले तरी आरोग्य आणि पर्यावरण मात्र, आपल्यापासून दूर जात आहे. याचे रक्षण हेच आपल्या सुखी जीवनाचे आणि भविष्याचे गमक असल्याने सायकलचा जास्तीत जास्त उपयोग करून आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. पर्यावरणाचे संरक्षण आणि होणारा ऱ्हास टाळू शकतो, असे महापौर ढोरे यांनी सांगितले.

यावेळी, जैवविविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, टाटा मोटर्स युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, प्रमोद ओंभासे, प्रेरणा सिनकर, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

सायक्लोथॉन स्पर्धेसाठी २ हजारहून अधिक सायकलप्रेमींनी नोंदणी करून सहभाग घेतला. सहभागींना प्रमाणपत्र व पदक देवून गौरविण्यात आले. तत्पूर्वी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांनी योगाचे सादरीकरण केले. तसेच, झुंबा खेळाचा सर्वांनी आनंद घेतला.

पिंपरी चिंचवड शहर हे स्वच्छ, सुंदर, आरोग्य संपन्न तसेच पर्यावरणपुरक बनविण्याकरीता शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी महानगरपालिकेमार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून “पिंपरी चिंचवड सायक्लोथॉन रॅली २०२२”चे आयोजन करण्यात आले होते. “पिंपरी चिंचवड सायक्लोथॉन रॅली २०२२” नाशिक फाटा ते बीआरटीएस रस्त्यावरील कल्पतरू सोसायटी, नाशिक फाटा पुलाजवळ, पिंपळे गुरव पासून वाकड मुंबई – बैंगलोर पश्च‍िम बाहय वळणावरील पुलाखालून पुन्हा त्याच मार्गाने कल्पतरू सोसायटी, नाशिक फाटा पुलाजवळ, पिंपळे गुरव अशी पार पडली. महापालिकेमार्फत वेबसाईट, फेसबुक, सारथी अॅप व इतर विविध सोशल माध्यमांद्वारे नागरिक, सायकल प्रेमी तसेच जास्तीत जास्त सायकलस्वारांनी सायक्लोथॉन रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

सायक्लोथॉन रॅली अनुषंगाने शहरातील इंडो एथेलॅटिक्स सोसायटी निगडी, इको पेडलर चिंचवड, पिंपरी चिंचवड सायकलींग असोसिएशन, वृक्षवल्ली संस्था, विविध एनजीओ, अविरत श्रमदान संस्था, पर्यावरण प्रेमी संस्था, बाईक्स संस्था, पीसीएमसी सायकल क्लब, भ्रमंती सायकल ग्रुप, आयटीडीपी संस्था, सायकल प्रेमी संस्था व इतर सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments