पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवृत्त मुख्य उद्यान अधीक्षक स्व. शांताराम लक्ष्मण भोंडवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त “हरित राजा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.१५ एप्रिल) दुपारी तीन वाजता पिंपरी, संत तुकाराम नगर येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ प्रेक्षागृह येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, निवृत्त आयएएस अधिकारी जयराज फाटक, दिलीप बंड, हिवरे बाजारचे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार आदी उपस्थित राहणार आहेत.
तसेच मुंबई म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, सेवा व दक्षता विभागाचे संयुक्त सचिव आशिष शर्मा, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील, मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, आदींची विशेष उपस्थिती असणार आहे.” हरित राजा” या कार्यक्रमात स्व. शांताराम भोंडवे यांच्या जीवन कार्यावर आधारित लघुपट आणि “स्नेहबंध कौटुंबिक वात्सल्याचे” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक आयएएस अधिकारी संकेत शांताराम भोंडवे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.