Tuesday, February 18, 2025
Homeक्रिडाविश्व13 वर्षाखालील मुलांच्या "व्हेरॉक कप" T20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

13 वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप” T20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

सालाबादप्रमाणे पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने उन्हाळी क्रिकेट मोसमाची सुरुवात करताना युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे दृष्टिकोनातून 13 वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप” ह्या T20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 30 मार्च 2023 ते 14 एप्रिल 2023 दरम्यान होणाऱ्या ह्या स्पर्धेत यजमान व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीच्या दोन संघासह खालील संघ सहभागी होणार आहेत.
  • आदित्य काळे स्पोर्ट्स अकॅडमी
  • एच के बाऊन्स अकॅडमी
  • आर्यन्स क्रिकेट अकॅडमी,
  • ब्रिलियंट्स क्रिकेट अकॅडमी
  • स्पोर्ट्स पार्क अकॅडमी
  • अजित वाडेकर क्रिकेट अकॅडमी
  • रायझिंग स्टार क्रिकेट अकॅडमी
  • फ्रेंड्स क्रिकेट अकॅडमी
  • नॅशनल स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी
  • स्पेशालाईज्ड क्रिकेट अकॅडमी
  • स्कोअर स्पोर्ट्स अकॅडमी
  • गॅरी कर्स्टन अकॅडमी
  • पेस अथलेटिक्स अकॅडमी
  • आर्यन्स वर्ल्ड स्कुल अकॅडमी

अशा नामांकित सोळा संघांना निमंत्रित करण्यात आले आहे, संपूर्ण स्पर्धा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या नियमानुसार खेळवण्यात येईल,सुरुवातीला चार गटात साखळी सामने होतील व गुणानुक्रमे चार अव्वल संघांमध्ये उपांत्यफेरीचे सामने होतील.

अंतिम सामना 14 एप्रिल 2023 रोजी होईल,थेरगाव येथील मैदानावर 30 मार्च 2023 रोजी स्पर्धेचे उदघाटन होईल , स्पर्धेतील सर्व सामने थेरगाव येथे होतील, प्रत्येक सामना 20 षटकांचा असेल, प्रत्येक सामन्यातील सामनावीरांना व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज,गोलंदाज,क्षेत्ररक्षक व स्पर्धेतील मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंना तसेच उपविजेता व विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात येईल पारितोषिक वितरण 14 एप्रिल 2023 रोजी भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांचे शुभहस्ते होईल,अशी माहिती क्रिकेट विजय पाटील यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments